कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur ZP Madarsangh 2025: पाडळी खुर्द नवा मतदारसंघ, करवीरमध्ये असणार 12 ZP मतदारसंघ

01:13 PM Jul 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यामुळे येत्या काळात निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार आहे

Advertisement

चुये : ग्रामीण भागातील नेते, कार्यकर्ते आणि जनतेचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेकडे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदारसंघांची पुनर्रचना जाहीर झाली. अखेर जिल्हा परिषद मतदारसंघ (गट) आणि पंचायत समिती मतदारसंघ (गण) यांची रचना स्पष्ट झाली आहे. यामुळे येत्या काळात निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार आहे.

Advertisement

करवीर तालुक्यामध्ये नवीन मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. याठिकाणी आता 11 ऐवजी 12 जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे गट असणार आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघात पाडळी खुर्द हा नवीन मतदारसंघ मिळाला आहे. तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी मतदारसंघ यादी प्रसिद्ध केली.

करवीर तालुक्यात पूर्वी 11 गट आणि 22 गण अस्तित्वात होते. नव्या रचनेनुसार मतदारसंख्येत वाढ केली आहे. त्यानुसार पाडळी खुर्द हा नवीन मतदारसंघ यावेळच्या रचनेमध्ये निर्माण झाला आहे. परिणामी एक गट आणि दोन गण नव्याने स्थापन झाले.

जुन्या मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात लक्षणीय तर काही मतदारसंघात तुरळक बदल झाला. निगवे खालसा गट हा करवीर आणि दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघात प्रथमच विभागला आहे. नव्या रचनेत परिते जि. .मतदारसंघाची विभागणी केली आहे. त्यातील काही गावांचा नव्या पाडळी खुर्द मतदारसंघात तर काही गावांचा निगवे खालसा मतदासंघात समावेश केला आहे.

करवीर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात समान मतदारसंघ

नव्या रचनेमध्ये करवीर विधानसभा मतदारसंघात सहा आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात सहा जिल्हा परिषद मतदार संघ समाविष्ट केले आहेत. गेल्यावेळी तालुक्यात 11 गट तर 22 गण होते. त्यामध्ये करवीर मतदारसंघात सहा गट तर दक्षिण मतदारसंघात पाच गटांचा समावेश होतो. नव्या रचनेत दोन्ही विधानसभा मतदारसंघात समान गट अस्तित्वात आले आहेत.

नवा मतदारसंघ, नवी गावे, नवे कार्यकर्ते

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदारसंघाची नव्याने रचना सादर झाली. यामध्ये अनेक गावांची या मतदारसंघातून त्या मतदारसंघात अदलाबदल झालेली आहे. इच्छुक उमेदवारांना मतदारसंघ निवडताना नवा मतदारसंघ त्यातील नवीन गावे आणि नवीन कार्यकर्ते अशी मांडणी करावी लागणार आहे.

त्यामुळे मातब्बर इच्छुक उमेदवारांना नवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. नवीन रचना ही नवख्या उमेदवारांसाठी सोयीची तर अनुभवी उमेदवारांना गैरसोयीची ठरणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#karveer#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaKolhapur ZP ConstituencyKolhapur ZP Election 2025Political NewsZP election 2025
Next Article