For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

40 वर्षिय महिलेवर मारहाण करून अत्याचार! गुन्हा दाखल

11:42 AM Jul 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
40 वर्षिय महिलेवर मारहाण करून अत्याचार  गुन्हा दाखल
Advertisement

कवठेमहांकाळ प्रतिनिधी

Advertisement

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुची येथील एका 40 वर्षीय मा†हलेस मारहाण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाळू ढेरे विरोधात कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे.

याबाबत पोलसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, तालुक्यातील कुची परिसरात हि घटना घडली असून आरोपीने पडित महिला घरात एकटी असताना तिच्या घरात घुसून हे कृत्य केले आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत बुधवार दि 3 रोजी दुपारी 12 च्या सुमारास आरोपी घरात घुसला. त्यानंतर त्याने पीडीतेवर अत्याचार केला. अत्याचार करत असताना विरोध करताना आरोपीने पिडीतेस मारहाण केली आहे. अत्याचार करून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलसांनी पीडीत महीलेचा जबाब नोंदवून तक्रार दाखल करून घेतली आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आ†धक तपास विनायक मसाळे करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.