महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ध्वजारोहण न करणाऱ्या तलाठ्याचा चंदुर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध! तलाठ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

01:13 PM Aug 14, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

चंदुर वार्ताहर

Advertisement

संपूर्ण देशात हर घर तिरंगा उपक्रम राबवला जात असताना आज हातकलंगले तालुक्यातील मौजे चंदूर येथे तलाठी कार्यालयात 13 ऑगस्ट व 14 ऑगस्ट या दोन दिवसात एकदाही ध्वजारोहण करण्यात आले नाही. याबाबत चंदुरच्या तलाठी राहत शेख यांना चंदुरचे सरपंच स्नेहल कांबळे यांनी जाब विचारला असता तलाठी राहत शेख यांनी उद्धट उत्तर देत आम्हाला ध्वजारोहण संबंधी कोणतीही शासकीय परिपत्रक मिळाले नसल्याचे सांगितले.

Advertisement

दरम्यान, ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गावातील जेष्ठ नागरिक व गावकरी सर्वजण गाव चावडी येथे जमा झाले व याबाबत महसूल चे वरिष्ठ अधिकारी यांना सदर घटनेची माहिती दिली. हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील यांनी सर्व गावकऱ्यांच्या वतीने तलाठी राहत शेख यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केलेली आहे.

Advertisement
Tags :
kolhapur news
Next Article