भरावामुळेच चिखली परिसरात पूरस्थिती गंभीर! तात्काळ मो-या पाडाव्यात; पूरग्रस्तांची अधिकाऱ्यांच्याकडे मागणी
प्रयाग चिखली परिसरातील पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या रेडेडोह ठिकाणी भराव्याला मो-या पाडाव्यात अशा आशयाचे निवेदन दिल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय भारतीय महामार्ग (नॅशनल हायवे) कार्यालयाचे उपव्यवस्थापक गोविंद बारवा यांनी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील रेडेडोह ठिकाणी पाहणी करून संबंधित पुरग्रस्तांच्याकडून माहिती घेतली. निव्वळ महामार्गाच्या भराव्यामुळेच प्रयाग चिखली परिसरात पूरस्थिती गंभीर होत असल्याचे पूरग्रस्तांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी पुढाकार घेऊन याबाबतचे निवेदन नुकतेच नॅशनल हायवे कार्यालयाला दिले होते.
यावेळी राजेंद्र सूर्यवंशी तसेच येथील पूरग्रस्तांनी भराव्याला पुराचे पाणी कशा प्रकारे तटून राहते. याबाबतची ची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली तसेच उपाय म्हणून तेथील रेडेडोह तसेच शिवाजी पुल ते रजपुतवाडी या दरम्यान ठिकठिकाणी कमानीच्या मोरीच्या बांधकामाची मागणी केली.
दिलेल्या माहितीच्या आधारे अहवाल आपण वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवणार असल्याचे गोविंद बारवा यांनी पूरग्रस्तांना सांगितले. दरम्यान याकरिता पूरग्रस्त गावातून एक कृती समिती निर्माण करून या प्रश्नाबाबत पाठपुरावा करणार असल्याचे करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले