मुख्यमंत्र्यांकडून फडणवीसांची कोंडी! समरजीत घाटगेंचं महाविकास आघाडीत स्वागत! अनेकजण येण्यास इच्छुक
महाराष्ट्रातील महायुतीच्या तीन चाकातील नटबोल्ट आता पडत असून निवडणुकीपर्यत आता महायुती वेगळी झाल्याचं पहायला मिळेल असं विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचीही कोंडी केली असल्याची टिका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली.
बदलापूर येथे झालेल्या बालिका अत्याचाराविरोधात आज कोल्हापूरातील बिंदू चौकात मुक निदर्शने करण्यात आली. महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये नेत्यांनी तोंडाला आणि हाताला काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला.
दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटालांनी सरकारवर जोरदार टिका केली. राज्यातील कायदा व्यवस्था ढासळली महिलांवरिल अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. गृहखातं फक्त पक्ष फोडण्याच काम करत असून सरकारला नागरीकांच्या अडचणींची कोणतीच पर्वा नसल्याचंही सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=2D1plxuzzbo[/embedyt]
मुख्यमंत्र्यांचा तो दावा खोटा..
बदलापूरमध्ये भाडोत्री लोकांनी आंदोलन केलं असं मुख्यमंत्री म्हणत आहेत मात्र एफआयआर बघितला तर गुन्हे नोंद झालेली शंभर टक्के बदलापुरातील होती असा खुलासा त्यांनी केला. हे सरकार जनतेला गृहीत धरत आहे बदलापूर घटनेनंतर संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित होते मात्र त्या उलट आंदोलन करणाऱ्या जनतेवर गुन्हे दाखल केले असंही आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
सदावर्ते कुणाचा माणूस ?
सरकारवर जोरदार टिका करताना, महाविकास आघाडीने महिला अत्याचाराविरोधात बंद पुकारला होता पण त्याला गुणरत्ने सदावर्ते यांनी खोडा घातला. हे सदावर्ते कोण आहेत हे सगळ्या जगाला माहीत आहे. यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला. त्यांना कोणाचा पाठिंबा कोण आहे हेसुद्धा सर्वांना माहित असल्याची टिका त्यांनी सरकारवर केली.
समरजीत घाटगेंचं महाविकास आघाडीमध्ये स्वागत
महायुतीची ही अनैसर्गिक युती आहे. त्यामुळे त्यातील नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना ही कागल मधील राजकीय युती अजिबात रुचलेली नाही. त्यामुळे कागलमध्ये बदल होणास सुरुवात झाली असून ती आता हळूहळू संपुर्ण राज्यातील प्रत्येक मतदारसंघात दिसून येईल. समरजीत राजे यांच्याबरोबर माझे फोनवरून बोलणे झाले असून ते भेटायला येणार असल्याचा खुलासा करताना त्यांचं महाविकास आघाडीमध्ये स्वागत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
अनेकजण महाविकास आघाडीसोबत येण्यास इच्छुक
महाविकास आघाडीमध्ये चालु असलेल्या इनकमिंगवर माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर आमदार सतेज पाटलांनी के.पी. पाटील यांच्यासह अनेक नेते महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या सोबत येण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. याबाबत महाविकास आघाडीच्य़ा सर्व नेत्यांशी चर्चा करूनच तो मतदारसंघ जागा वाटपात कोणाकडे जाणार आहे हे पाहूनच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नटबोल्ट निघू लागलेत
महायुतीच्या कारभारावर टिका करताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या तीन चाकांमधील नटबोल्ट निघू लागले असून विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुती वेगळी झाल्याची पाहायला मिळेल असे त्यांनी म्हटलं आहे.