For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : कोल्हापूर महापालिका राज्यात प्रथम

11:58 AM Oct 19, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur   कोल्हापूर महापालिका राज्यात प्रथम
Advertisement

        आरोग्य विषयक सेवेत शासनाने केलेल्या मूल्यांकनात मिळाले ८९ गुण

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धती अंतर्गत कुटुंब कल्याण, माता-बाल संगोपन व लसीकरण कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दलचे प्रशंसापत्र अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (कुटुंब कल्याण, माता-बाल संगोपन व शालेय आरोग्य), पुणे यांच्याकडून महापालिकेला प्राप्त झाले आहे.

प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त किरण धनवडे व मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्या नियोजनानुसार महापालिकेची हॉस्पिटल्स, प्राथमिक आरोग्य केंद्रे व नागरी आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्रे यांच्या माध्यमातून माता-बाल संगोपन व लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आले. शासनाने सप्टेंबरअखेर कार्यक्रमांचे मूल्यांकन केले असता, कोल्हापूर महापालिकेला एकूण ८९ गुण मिळाले.

Advertisement

मूल्यांकनात गरोदर माता नोंदणी, १२ आठवड्यांपूर्वी नोंदणी, गरोदर माता लसीकरण, लोहयुक्त गोळ्यांचे वितरण, प्रसूतीपूर्व चार तपासण्या, जिवंत जन्म नोंदणी तसेच ० ते १६ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण या निर्देशकांचा समावेश होता. त्याचबरोबर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व प्रसूती पश्चात तांबी बसविणे या बाबींवरही मूल्यांकन केले. महापालिकेला मिळालेल्या या सन्मानामध्ये प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, आरसीएच कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविकांचे योगदान राहिले आहे.

Advertisement
Tags :

.