For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : कोल्हापूर महापालिका निवडणूक; दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला वेग

01:35 PM Jan 07, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   कोल्हापूर महापालिका निवडणूक  दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला वेग
Advertisement

                             कोल्हापुरात चौकाचौकात प्रचाराची धामधूम

Advertisement

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला गती आली आहे.उमेदवारांनी घरोघरी भेट देण्यावर भर दिला आहे. काल मंगळवारपासून चौकाचौकात, गल्लीगल्लीत प्रचार करणाऱ्या रिक्षा, जीप फिरू लागल्या आहेत. महिलाही ग्रुपने एकाच रंगातील साड्या परिधान करून प्रचाराची पत्रके घरोघरी पोहोचवताना दिसत आहेत.महापालिका निवडणुकीसाठी अनेक प्रभागांमध्ये तिरंगी, चौरंगी लढत होतआहे. महाविकास आघाडी, महायुती, राष्ट्रवादी शरद पवार गट आणिआम आदमी पक्ष आघाडी आणि जनसुराज्यशक्ती आणि रिपाई आठवले गट आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत.

याशिवाय अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांचे उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. निवडणूक चिन्हे मिळाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला गती आली आहे. पण चारसदस्यीय प्रभाग असल्याने कार्यक्षेत्रमोठे आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी नियोजन करून घरोघरी भेट देण्यावर भर दिला आहे.महाविकास आघाडी, महायुतीच्या उमेदवारांची प्रचाराची वाहने चौकाचौकात कालपासून फिरू लागली आहेत. ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचार करणाऱ्या रिक्षाही गल्लोगल्ली उमेदवारांच्या चिन्ह फोटो असलेल्या डिजिटलसह फिरू

Advertisement

लागल्या आहेत. याशिवाय आघाडी, महायुतीसह त्यातील मित्र पक्षांचीएलईडी स्क्रिनद्वारे प्रचार करणारी वाहने देखील चौकाचौकात उभी करून प्रचार केला जात आहे.

येथेस्क्रिनवरील माहिती पाहण्यासाठी गर्दी होत आहे. चार सदस्यीय प्रभाग रचना असल्याने प्रभाग मोठे आहेत. त्यामुळेउमेदवारांनी घरोघरी पोहोचण्यावर भर दिला आहे. अगदी निवडक कार्यकर्ते, बचत गटांच्या महिलांचे ग्रुप या प्रचारात उतरले आहेत. महिलांनी
पक्षाच्या झेंड्याची निगडीत साड्या परिधान केल्या आहेत. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह सहजपणे मतदारांपर्यंत पोहोचवले जात आहे. सकाळी ११ ते २ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यत महिलांचे ग्रुप प्रचारात सक्रिय होताना दिसत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Advertisement
Tags :

.