For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Municipal Corporation Election 2025: कोल्हापूर महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर ; प्रभागांसाठी रणांगण सज्ज

12:20 PM Nov 12, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur municipal corporation election 2025  कोल्हापूर महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर   प्रभागांसाठी रणांगण सज्ज
Advertisement

               महापालिका निवडणुकीसाठी कोल्हापूर सज्ज

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडतमध्ये ११ अनुसूचित जाती, २१ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित झाल्या. तर ४९ जागा सर्वसाधारणसाठी राहिल्या. महापालिकेच्या एकूण ८१ सदस्यसंख्ये पैकी ४१ महिला सदस्य असणार आहेत. आरक्षण सोडतची प्रक्रिया पूर्ण झाली असून आरक्षणाचे प्रारुप १७ रोजी प्रसिद्ध होईल. तर १७ते २४ रोजी दरम्यान आरक्षणबाबत हरकती सूचना दाखल करण्याची मुदत असणार आहे.

महापालिका मुख्य इमारतमधील छत्रपती ताराराणी सभागृहात हरकती, सूचना दाखल करता येणार आहेत. शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात मंगळवारी महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतची प्रक्रिया झाली. २०११ च्या जनगणनेनुसार यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ७२ हजार ००५ असून अनुसुचित जमातीची संख्या २९८९ एवढी आहे. महापालिकेची निवडणूक प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने होत असून २० प्रभागांमध्ये १९ प्रभाग चार सदस्यीय आणि एक प्रभाग पाच सदस्यीय असणार आहे. तर २० प्रभागांमध्ये ८१ जागा असणार आहेत. चार सदस्यीय प्रभागात सरासरी २७ हजार १२३ तर पाच सदस्यीय प्रभागात सरासरी सरासरी ३३ हजार ९०३ इतके मतदान असणार आहे.

Advertisement

आरक्षण सोडतची प्रक्रीया प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख रविकांत अडसूळ, उपआयुक्त उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवडे, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, मुख्यलेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव सुनील बिद्रे, निवडणूक अधीक्षक सुधाकर चलावाड यांनी राबविली.

सर्वाधिक लोकसंख्येनुसार अनु. जातीचे आरक्षण

प्रभागातीलसर्वाधिक लोकसंख्येनुसार पहिल्या ११ प्रभागत अनुसुचित जातीचे आरक्षण टाकण्यात आले. प्रभाग क्र. ४ मध्ये २८५६४ लोकसंख्येपैकी ९३७६ इतकी सर्वाधिक लोकसंख्या अनु, जाती प्रवर्गाची आहे. त्यानुसार प्रभाग क्र. १८, १७, १३, १५, १, ११, १९, २, ६ आणि २० हे प्रभाग थेट अनु.जातीसाठी आरक्षित करण्यात आले.

प्रत्येक प्रभागात ओबीसी आरक्षण

राज्य निवडणुक आयोगाकडुन आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक प्रभागातील एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव ठेवण्यात आले. त्यानुसार १ ते २० प्रभागात प्रत्येकी एका जागेवर थेट नागरिकांचा मागस प्रवर्गाचे आरक्षण टाकण्यात आले. मात्र ओबीसीसाठी २१ जाग असल्याने शेवटच्या पाच सदस्यीस प्रभाग असलेल्या प्रभाग क्र. २० मध्ये ओबीसीसाठी थेट दोन जागा आरक्षित करण्यात आल्या.

दीड तासात प्रक्रिया पूर्ण

आरक्षण सोडतीसाठी यापूर्वी साधारणतः तीन तास लागायचे. मात्र यंदा चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे आरक्षण सोडत प्रक्रिया सुलभझाली. एक प्रभागात चार आरक्षण असल्यामुळे कोणताही आक्षेप न घेता केवळ दीड तासातच आरक्षण सोडतीची प्रक्रीया पूर्ण झाली.

थेट प्रक्षेपणाचीही सुविधा

आरक्षण सोडतची प्रक्रिया आरक्षण सोडत प्रक्रिया शांततेत महापातिका निवडणुकीसाठी मंगळवारी आलेल्या आरक्षण सोडतची प्रकिया पूर्णरणे शांततेत पार पडली. आरक्षणाचे प्रारुप १७ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर १७ ते २४ नोव्हेंबर दरम्यान आरक्षण सोडतवर हरकती सूचना दाखल करण्यासाठी मुदत असणार आहे. दाखल झालेल्या हरकती, सूचनांचा विचार करुन आरक्षयाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. - के, मंजुलक्ष्मी, प्रशासक मनपा
नागरिकांना घरबसल्या पाहता यावी, यासाठी महापालिकेने बेट प्रक्षेपणचीही सुविया केली होती. महापालिकेची अधिकृत फेसबूक पेज आणि युट्यूब चैनेत तसेच स्वानिक केवल वाहिन्यांवरुन आरक्षण सोडतचे थेट प्रक्षेपण झाले.

८१ जागांसाठीचे आरक्षण असे:

अनुसुचित जाती पैकी ६ महिलांसाठी ११ जागा
नागरिकांचा मागास प्रवर्ग २१ जागा पैकी ११ महिलांसाठी
सर्वसाधारण ४९ जागा पैकी
२४ जागा महिलांसाठी

Advertisement
Tags :

.