यजमान संघासह, कोल्हापूर, मुंबई संघांची विजयी सलामी
इस्लामपूर :
विद्यामंदिर हायस्कूलच्या हॉकी क्रीडांगणावर सुऊ झालेल्या 38 व्या राज्यस्तरीय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेत यजमान पाटील ट्रस्टसह पद्मा पथक कोल्हापूर, मुंबई, कोल्हापूर पोलीस, मुंबई पोलीस संघांनी विजयी सलामी दिली. स्व. खा. एस. डी. पाटील यांच्या 114 व्या जयंती निमित्त येथे गुरुवारी स्पर्धेस दिमाखात सुऊवात झाली.
सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यात कोल्हापूरच्या पद्मा पथक संघाने पुण्याच्या खडकी वॉरियर्स संघास 5-0 गोलफरकांनी एकतर्फी नमवले. पद्मपथकच्या प्रथमेश धुरीने 2, प्रथमेश लाड याने 2 व हरीश तोरस्कर याने 1 गोल नोंदवला. प्रथमेश धुरी हा सामनावीरचा मानकरी ठरला. दुसऱ्या सामन्यात मुंबई पोर्ट ट्रस्ट संघाने फलटण जिमखाना संघाचा 2-0 गोलफरकाने पराभव केला. मुंबई पोर्ट ट्रस्टचा अथर्व पवार सामनवीर ठरला.
तिसऱ्या सामन्यात कोल्हापूर पोलीस संघाने एस. डी पाटील ब्ल्यू संघास 2-1 गोलफरकांनी हरवले. कोल्हापूर पोलीस संघाकडून ओंकार कावरे व मुकुंद रजपूत यांनी गोल केले. तर एसडी पाटील ब्ल्यू संघाच्या शंभूराज शिंदे यांनी गोल नोंदवला. या सामन्यात कोल्हापूर संघाचा मुकुंद रजपूत सामनावीरचा मानकरी ठरला. चौथ्या सामन्यात मुंबई पोलीस संघाने रेल्वे बॉईज पुणे संघवर 2-0 गोलफरकांनी मात केली. मुंबईचा रोहन पवार सामनावीर ठरला.
पाचव्या सामन्यात यजमान एसडी पाटील ट्रस्ट संघाने पद्मा पथक कोल्हापूर संघाचा 6-0 गोलने एकतर्फी पराभव केला. इस्लामपूरच्या राहुल बसगोंडा याने 3, अजित शिंदेने 2 व सचिन भोसले याने 1 गोल नोंदवून संघास रोमहर्षक विजय मिळवून दिला. बसगोंडा हा सामनावीर ठरला. या स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, मुंबई, नांदेड, फलटण व यजमान पाटील ट्रस्ट संघांनी सहभाग नोंदवला.
पंच म्हणून दिग्विजय नाईक, विनीत निमल, रमेश उत्तेकर, राहुल गावडे, कुणाल साधवानी, कौशिक साधवानी, मनोज इनानी, ओंकार भांडवले, विनोद ढोले, प्रशांत निवळे, करण सिंग, अभिजीत पाटील, विजय जाधव, सोमनाथ कांबळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेचा शुभारंभ रयत शिक्षण संस्था साताराचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य अजितकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सामना समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले. संजय चव्हाण, संजय कबुरे, राजेंद्र खंकाळे, जयवंत जाधव, ताहीर खाटीक, विजय सावंत, प्रशांत जाधव, सत्वशील पाटील, सत्यजित पाटील, सुहास पाटील यांनी स्पर्धेचे संयोजन केले सूत्रसंचलन व आभार सदाशिव जाधव यांनी मानले.