For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वत:च्या स्वार्थासाठी छत्रपती घराण्याचा अपमान ! मंडलिकांनी माफी मागावी अन्यथा...!- सतेज पाटील

06:35 PM Apr 11, 2024 IST | Abhijeet Khandekar
स्वत च्या स्वार्थासाठी छत्रपती घराण्याचा अपमान   मंडलिकांनी माफी मागावी अन्यथा      सतेज पाटील
MLA Satej Patil Sanjay Mandlik
Advertisement

संजय मडलिकांनी शाहू महाराजावर केलेली टिका ही स्वत:च्या स्वार्थासाठी असल्याने कोल्हापूरची जनता त्यांना माफ करणार नाहीत. सुरवात संजय मंडलिक यांनी केली आहे त्याचा शेवट कोल्हापूरची जनताच करेल असे जोरदार प्रत्युत्तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिले आहे. आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे नसून ते खरे शाहू विचारांचे खरे वारसदार नसल्याचं विधान महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी आपल्या नेसरी येथील प्रचार दौऱ्यामध्ये केल्याने कोल्हापूरचे राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे.

Advertisement

आज कोल्हापूरात माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शाहू महाराज हे कोल्हापूरातील नसल्याच्या त्यांच्या विधानाचा निषेध करत त्यांनी मंडलिकांवर टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, "संजय मंडलिकांनी शाहू महाराज यांच्यावरील टीका स्वत:च्या स्वार्थासाठी केली आहेत. कोल्हापूरकर छत्रपती घराण्याचा अपमान कधीच सहन करणार नाहीत. याची सुरुवात त्यांनी केलीय...शेवट कोल्हापूरची जनता करेल." अशा शब्दात त्यांनी फटकारले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले " संजय मंडलिकांच्या या विधानानंतर कोल्हापुरात शाहूप्रेमी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर त्वरित माफी मागावी. नाहीतर कोल्हापूरची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही." असे आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.