For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुंतवणूकीवर परतावा देण्याच्या अमिषाने 1 कोटी 11 लाखांची फसवणूक

03:49 PM Dec 13, 2023 IST | Abhijeet Khandekar
गुंतवणूकीवर परतावा देण्याच्या अमिषाने 1 कोटी 11 लाखांची फसवणूक
Kolhapur fraud
Advertisement

गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जीएसटी अधिकाऱ्यासह 5 जणांना अटक

Advertisement

कोल्हापूर  प्रतिनिधी

गुंतवणूकीवर दरमहा पाच टक्के परतावा देण्याच्या अमिषाने गुंतवणूकदारांची 1 कोटी 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीच्या प्रमुखासह नऊ जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या पैकी कंपनी प्रमुखासह, जीएसटी अधिकारी अशा पाच जणांना अटक करण्यात आली. याबाबत विजया दीपक कांबळे (वय 43, रा. प्रताप भोसलेनगर, सरनोबतवाडी, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली.

कंपनीचा प्रमुख इंद्रजीत सुभाष कदम (वय 46, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) याच्यासह राहुल शशिकांत गाडवे (52,रा. सातवी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर), जीएसटी अधिकारी कुमार जोतिराम उबाळे (52,रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर), अमरदीप बाबूराव कुंडले (49, रा. राजगड कॉलनी, कोल्हापूर), आबासो बाळू वाडकर (रा. मणेर मळा, उचगाव, ता. करवीर) या पाच जणांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. यांच्यासह अतुल वाघ (रा. देवकर पाणंद, कोल्हापूर), शैलेश वाघ (रा. फुलेवाडी, कोल्हापूर), शैलेश मरगज (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) आणि सुनीता आबासो वाडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजारामपुरी येथील तिसऱ्या गल्लीत असलेल्या गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीने कार्यालय होते. ऑगस्ट 2022 पासून कंपनी गुंतवणूकदारांकडून पैसे भरून घेत होती. दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित केले जात होते. यासह अनेक अमिष दाखवून कंपनीमार्फत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आले. यामधून गुंतवणूकदार कंपनीकडे आकर्षित झाले. सुरुवातीचे काही महिने परतावे दिल्यानंतर मार्च 2023 पासून परतावे देणे बंद केले. याबाबत काही गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यांच्या सूचनेनुसार आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने चौकशी करून कंपनीतील नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच पाच जणांना अटक केली.

कंपनीचे कार्यालय विकले
दरम्यान गोल्ड लाईफ डिस्ट्रीब्युटर्स कंपनीच्या वतीने राजारामपुरी परिसरात अलिशान कार्यालय उघडण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी हे कार्यालय विकल्याचे समोर आले आहे. हे कार्यालय विकून 18 कोटी रुपये गुंतवणूकदारांचे परत केल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Tags :

.