महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गुळ, काजू, आजरा घनसाळ, काळा जिरगाचाही महोत्सव भरावा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सूचना

09:04 PM May 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
Kolhapur Mango Festival Collector Amol Wedge
Advertisement

'पणन'तर्फे आयोजित आंबा महोत्सवाला दिली भेट; तीन दिवसात सहा हजार डझन आंबा विक्री

कोल्हापूर प्रतिनिधी

कृषी पणन मंडळतर्फे आयोजित कोल्हापूर आंबा महोत्सव उपक्रम कौतुकास्पद आहे. याचप्रमाणे राज्यातील विविध शहरात जिल्ह्यात उत्पादीत होणार गुळ, काजू, आजरा घनसाळ, काळा जिरगा या शेतमालाचेही महोत्सव आयोजित करण्यात यावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल वेडगे यांनी केली.

Advertisement

राजारामपुरी येचील भारत हौसिंग सोसायटी हॉलमध्ये राज्य कृषी पणन मंडळतर्फे आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. रविवारपासून महोत्सवास प्रारंभ झाला. मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महोत्सवाला भेट देत येथील आंबा उत्पादकांशी संवाद साधला. यावेळी उत्पादक कोठून आले आहेत, आंबा बागेतून उत्पन्न किती मिळते, खर्च किती येतो तसेच त्यांना काही अडचणी आहेत काय याची माहिती जिल्हाधिकारी वेडगे यांनी जाणून घेतली. तसेच आंब्यांच्या विविध जातीचे प्रदर्शन असलेल्या दालनास भेट दिऊन या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी पणनचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले उपस्थित होते.

Advertisement

याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कृषि पणन मंडळ आंबा महोत्सव सारख्या महोत्सवाचे आयोजन करून शेतकऱ्यांना वेट बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे. महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्केटिंगमध्ये एक नवी दिशा देण्याचे काम करत आहे. भविष्यात अशाप्रकारे विविध शेतमालांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी येडगे यांनी व्यक्त केली यावेळी कृषि पणन मंडळाचे प्रतिक गोणुगडे, अनुप थोरात, प्रसाद भुजबळ, ओंकार माने, अनिल जाधव, संदेश पिसे आदी उपस्थित होते.

सहा हजार डझन आंबा विक्री
आंबा महोत्सवाला कोल्हापूरकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवामधून अवघ्या तीन दिवसात सहा हजार डझन आंबा विक्री झाली आहे. यामधून सुमारे २२ लाखांहून अधिकची उलाढाला झाली असल्याची माहिती पणनचे उपसरव्यवस्थापक डॉ. घुले यांनी दिली.

Advertisement
Tags :
Collector Amol WedgeKolhapur Mango Festival
Next Article