महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाण्याचा ठणठणाट! जलअभियंत्याच्या घरासमोरच अंघोळ करून प्रशासनाचा निषेध

11:24 AM Nov 07, 2023 IST | Abhijeet Khandekar
Kolhapur Mahanagarpalika protests
Advertisement

बालिंगा उपसा केंद्राचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरात पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात पाण्याचा तुटवडा भासत आहे आणि तरीही जलअधिकारी टँकरद्वारे केवळ कारभाऱ्यांचेच लाड पुरवत असल्याच्या आरोप करून सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह देसाई यांनी जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या घरासमोर पाण्याने आंघोळ करून प्रशासनाचा निषेध केला.

Advertisement

बालिंगा उपसा केंद्रात दगड कोसळल्याने त्याचे दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित झाल्याने शहरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. महापालीकेकडून प्रत्येक प्रभागात टँकर आणि खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या आठवड्याभरापासून पाणी नसल्याने नागरिकांची ही गैरसोय झाली आहे.

Advertisement

कोल्हापूर शहराच्या उपनगरात अनेक प्रभागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असताना अधिकारी मात्र मोजक्याच कारभाऱ्यांना दाद देऊन त्यांच्या प्रभागात पाणीपुरवठा करत आहेत. असा आरोप करून शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. प्रभागात पाण्यासाठी टँकरची मागणी केल्यास टँकर सध्यातरी उपलब्ध नसल्याचे कारण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे. महापालिकेच्या उत्तराला वैतागलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट शहर जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनाच धारेवर धरले आहे. जल अभियंता आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज सकाळी सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांनी सरनोबत यांच्या घरासमोर जाऊन अंघोळ केली आणि प्रशासनाचा निषेध केला.

Advertisement
Tags :
kolhapurKolhapur Mahanagarpalikaprotests bathingwater engineer
Next Article