कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Gas Explosion: गॅस गळतीमुळे स्फोट, स्फोटात घराचे प्रचंड नुकसान

05:46 PM Sep 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनंत चतुर्दशी दिवशीच घटना ,घरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला 

Advertisement

महागाव: महागाव ता.गडहिंग्लज येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सिलेंडर गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली. सुदैवाने घरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला मात्र घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही दुर्दैवी घटना येथील तुषार गारमेंटचे मालक सुनील खटावकर त्यांच्या घरी घडली.

Advertisement

खिडकीच्या स्लाइडिंगच्या काचा फुटून शंभर मीटर अंतरावर जाऊन पडल्या. घरात आणि गल्लीत अक्षरशः काचांचा थर साचला होता.  घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महागावतील परीट गल्लीत कापड व्यावसायिक सुनील खटावकर यांचे घर आहे. त्यांच्या कुटुंबात दोन लहान मुलांसह आठजण राहतात. घटनेच्या अगोदर श्री खटावकर हे दुकानात होते. पत्नी घरीच होती.

स्फोट झाल्यानंतर शेजारील मुलाने माहिती दिली. घरी आल्यानंतर पत्नीला विचारले,तेव्हा तिने आम्ही सर्वजण गणपतीच्या आरतीला गेलो होतो.असे सांगितले.त्यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेबाबत माझी कोणाविरुद्धही तक्रार नाही असे खटावकरांनी पोलीस पंचनाम्यात सांगितले. 

शकडो हात मदतीसाठी धावले

सदरची दुर्दैवी घटना समजताच सरपंच प्रशांत शिंदे,पोलीस पाटील प्रदीप कांबळे,व्यापारी संघटना,गणेश मंडळाचे कार्यकर्ते ,सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले. घरातीलआणि रस्त्यावरील सर्व काचा गोळा करत घरातील साहित्य व्यवस्थित ठेवण्यासाठी शेकडो हात मदतीसाठी धावले.

स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला
हा स्फोट इतका भयंकर होता की त्यामध्ये घरातील सर्व दरवाजे उकडून पडले.खिडक्यांच्या स्लाइडिंगच्या काचा परिसरात शंभर मीटर अंतरावर जाऊन पडल्या. खिडक्यांचे लोखंडी ग्रील निखळून पडले.

गणेशाचा आशीर्वाद असल्याने जीव वाचले

खटावकर यांच्या घरात मंडळातील कार्यकर्त्यांना विसर्जनानंतर प्रतिवर्षी जेवण दिले जाते. अर्धे जेवण तयार झाल्यानंतर गणेशाच्या आरतीसाठी सर्वजण गेले. त्याचवेळी गॅस गळतीमुळे ही दुर्दैवी घटना घडली. स्फोटानंतर घरातील दरवाजे निखळले मात्र दरवाज्यावर असलेल्या गणेश मूर्तींना काहीही झाले नाही. गणेशाच्या आशीर्वादामुळेच घरातील सर्वांचे जीव वाचल्याची नागरिकांच्यात चर्चा होती.

Advertisement
Tags :
_police_action@KOLHAPUR_NEWS# tarun bharat news # kolhapur ## tbdkolhapur##tarunbharatnews#blast#brekingnews#gadhinglaj#ganeshchaturthi#ganeshotsav2025#ganeshvisarjan#gas cylinder blast#Gascylinder#gascylinderblast#kolhapurbreking#mahagav#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaexplosion
Next Article