चेतन नरके यांची लोकसभेच्या रिंगणातून माघार! कोणाला पाठींबा लवकरच जाहीर करणार
गोकुळचे विद्यमान संचालक डॉ. चेतन नरके यांनी निवडणुकीच्या रिंगणातून आज अखेर माघार घेतली आहे. त्यासंदर्भातील निर्णय त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितला. आपण कोल्हापूर मतदार संघामध्ये गेले काही वर्ष तयारी केली आहे. असं असलं तरी काही राजकिय पेचामुळे मला कोल्हापूरचं तिकीट मिळालं नाही. पण लवकरच कार्यकर्त्यांशी चर्चा करून कोणाला पाठींबा द्यायचा यासंदर्भाती भुमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमघ्ये सांगितलं.
पहा VIDEO>>> चेतन नरके यांची लोकसभेच्या रिंगणातून माघार! कोणाला पाठींबा लवकरच जाहीर करणार
कोल्हापूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने लोकसभा निवडणूकीसाठी कोल्हापूर मतदारसंघातून इच्छुक असलेले गोकुळचे विद्यमान संचालक डॉ. चेतन नरके यांनी काहीही झालं तरी आपण निवडणुक लढवणारच असा पवित्रा घेतला होता. तसेच हातकणंगलेमधून आपल्याला शिवसेनेची ऑफरही होती असा खुलासाही त्यांनी केला होता. पण आता बदलत्या राजकिय घडामोडींमुळे त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका मांडली.
यावेळी त्यांनी, आपण गेली ३ वर्षे कोल्हापूरच्या विकासाचं व्हिजन घेऊन काम केलं. त्याला लोकांचा चांगला प्रतिसादही लाभत होता. पण आता हा निर्णय घ्यावा लागतोय याच वाईट वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणुकीमध्ये पक्षीय ताकत महत्वाची असून उमेदवाराला त्यामुळे बळ मिळेतं. असंही त्यांनी म्हटले आहे. तर येत्या काळात डॉ. चेतन नरके युवा सेतु नावाच्या आपल्या नविन संघटनेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील युवकांना रोजगार देण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांचा फोन...
डॉ. चेतन नरके यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन केल्याचं सांगितलं. आपल्याला राजकिय भविष्य आहे. गोकुळच्या माध्यमातून किंवा आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवाराला आपण मदत करावी असे आवाहनही त्यांनी केल्याचं त्यांनी सांगितलं.
पाठबळाची भुमिका लवकरच...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर आपण महायुतीच्या उमेदवाराला पाठींबा देणार का ? या प्रश्नावर त्यांनी यासंदर्भात मला माझ्या कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल. मी तसा मेळावा घेऊन कोणाला पाठींबा द्यायचा हे जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.