महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मैदान म्हटल्यावर नाका- तोंडात माती जाणारच! - हसन मुश्रीफ

02:27 PM May 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
Sanjay Mandalik Hasan Mushrif
Advertisement

‘ महाराज, मैदान म्हटल्यावर नाका -तोंडात माती जाणारच! पण तुम्ही एका पक्षाचा हिस्सा झालात. हे विसरू नका. निवडणूक लढवायची नसणाऱ्यांनी, उमेदवारीची झूल तुमच्या अंगावर टाकली. तुम्ही त्यांच्या गळाला लागलात. इथेच तुम्ही चुकलात.‘ असे स्पष्ट मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. गडहिंग्लज येथील महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

Advertisement

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘ वास्तविक शाहू महाराज निवडणुकीला तयार नव्हते. पण महाराज अकारण महाविकास आघाडीच्या गळाला लागले. सन्मानच द्यायचा होता, तर राज्यसभा निवडणुकीत छत्रपती शाहूंना खासदार करता आले असते. संभाजीराजे छत्रपती यांना यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने सन्मानपूर्वक खासदार केले होते हे कसे विसरता ?. ‘

Advertisement

आमदार राजेश पाटील म्हणाले, विरोधकांनी चंदगड आणि गडहिंग्लज मधील संजय मंडलिकांनी केलेला विकास उघड्या डोळ्यांनी पहावा आणि मग बोलावे. साडेचार वर्षांमध्ये चंदगड तालुक्यात तब्बल बाराशे कोटी रुपयांचा निधी खासदार संजय मंडलिक आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मिळवून दिला. तसेच काजू बोर्ड बाबत त्यांनी केलेले मोलाचे योगदान चंदगड आणि गडहिंग्लजवाशीयांनी विसरू नये.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, ‘ कोल्हापूरच्या महालक्ष्मी तीर्थस्थळाचा विकास, वाराणसी व तिरुपतीच्या धर्तीवर करण्यात येईल. त्यामुळे जिह्याचे धार्मिक पर्यटन वाढेल आणि त्याची जिह्याच्या विकासामध्ये भर पडेल. चंदगडमध्ये एमआयडीसी उभा करण्याच्या उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या घोषणेचा धागा पकडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर एमआयडीसीत मोठा उद्योग आणणार असल्याची माहिती दिली.

सिनेअभिनेता गोविंदा सभास्थळी आल्यानंतर तरुणाईने मोठा जल्लोष केला. या स्वागताने आपण भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीचा गौरव करून खासदार संजय मंडलिक यांना मताधिक्य देण्याचे आवाहन गोविंदा यांनी केले.

स्वागत व प्रास्ताविक सिध्दार्थ बन्ने यांनी केले. यावेळी संदीप नाथबुवा, महेश सलवादे, एल. टी. नवलाझा, विजय काळे, संजय संकपाळ यांनी मनोगते मांडली. कार्यक्रमास अॅङ. वीरेंद्र मंडलिक, प्रकाशराव चव्हाण, किरण कदम, महाबळेश्वर चौगले, जयपाल मुन्नोळी, किरण कदम, जयसिंग चव्हाण, संजय चितारी, बाबासो पाटील, उदय जोशी, शर्मिली मालनकर, मारुती राक्षे, मारुती कमते,अमोल नार्वेकर आदिंसह शहरवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अमोल मिटकरी म्हणाले, ‘ आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकाच विचाराचे असेल तर मोठ्या प्रमाणात निधी आपल्या भागासाठी प्राप्त होऊ शकतो. म्हणूनच खासदार संजय मंडलिक यांची निवड गडहिंग्लजच्या विकासाला मोठा हातभार लावणारी ठरेल.‘

लोकसभेत अभ्यास करून विचार करून बोलावे लागते. कुणीतरी लिहून दिलेली क्रिप्ट वाचून चालत नाही. त्यासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विषयांची जाण आणि अभ्यास असावा लागतो. कुणाच्यातरी रिमोट कंट्रोलवर चालणारा डमी खासदार चालत नाही. चंदगडवासियांना दत्तक घेण्याची विरोधकांची भाषा आम्ही चालू देणार नाही. यासाठी विकासाला पुढे घेऊन जाणारा खासदार पाहिजे. भावनेच्या आहारी जाऊन नव्हे तर सदसद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करा. असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले.

 

Advertisement
Tags :
hasan mushrifKolhapur LokSabhaSanjay MandalikShahu Chhatrapati
Next Article