For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रा. संजय मंडलिक यांच्या शाहूपुरी, राजारामपुरीतील पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

01:56 PM Apr 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
प्रा  संजय मंडलिक यांच्या शाहूपुरी  राजारामपुरीतील पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
Sanjay Mandalik Rajarampuri
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

लोकसभेचे येथील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राजारामपुरी व शाहूपुरी येथे काढलेल्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संजयदादांचा विजय असो, ‘फिर एक बार मोदी सरकार’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या पदयात्रेत उमेदवार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षिरसागर, प्रा. जयंत पाटील, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, सत्यजित ऊर्फ नाना कदम, रुपाराणी निकम, विलास वास्कर, माजी महापौर दीपक जाधव, मुरलीधर जाधव, करण दीपक जाधव आदी प्रमुख नेतेमंडळी पदयात्रेत सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. भाजप, शिवसेना, आरपीआय आठवले गट, जनसुराज्य आदी पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत मोठी गर्दी केली होती.

Advertisement

पदयात्रेचा प्रारंभ राजारामपुरी येथील माऊली पुतळ्यापासून केला. आतषबाजी, हलगी घुमक्याच्या निनादात आणि धनुष्यबाण विजयी करण्याच्या घोषणा देत पदयात्रा हनुमान मंदिर, राजारामपुरी 8 वी, 7 वी, व 3 ऱ्या गल्लीतून बागल चौकमार्गे शाहूपुरी 5 गल्ली, नाईक कंपनी, गल्लीतून महायुतीच्या प्रचार कार्यालयात पदयात्रेची सांगता करण्यात आली.

येथे मंडलिक म्हणाले, जिह्यातून दिवसेंदिवस मिळणारा वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजय निश्चित आहे. या विजयासाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षाचे नेते आपआपल्या पातळ्यावर काम करीत असून सर्वच कार्यकर्त्यांची मोठी ताकद माझ्यामागे उभी आहे. हेच सर्व कार्यकर्ते धनुष्यबाण चिन्ह घराघरात पोहचवून मोठ्या मताधिक्याचा विजय मिळवून देतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
या पदयात्रेत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहूल चिकोडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शैलष पाटील, मंडल अध्यक्ष सचिन कुलकर्णी, विकास घागेर, सागर संगोळी, ओंकार चव्हाण, नीलेश प्रभावळे, सचिन पवार, रमेश पुरेकर, वंदना बंबलवार, रंजना शिर्के, शेखर मंडलिक आदींसह भाजप, शिवसेना, जनसुराज्य, आरपीआय आठवले गट आदी घटक पक्षाचे कार्यकर्ते हजर होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.