महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गडहिंग्लज एमआयडीसीच्या भरभराटीसाठी मोठे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील राहू

01:29 PM May 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
Sanyogitaraje
Advertisement

युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांची ग्वाही

गडहिंग्लज : प्रतिनिधी

शाहू छत्रपती महाराज हे विकासाचे व्हिजन घेऊन लोकसभा निवडणुकीला उभे आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची त्यांची भूमिका राहणार आहे. गडहिंग्लज तालुक्यातील युवकांच्या हात काम मिळवून देण्याच्या दृष्टीने येथील एमआयडीसीची भरभराट होणे गरजेचे आहे. यासाठी या एमआयडीसीत मोठे प्रकल्प आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, अशी ग्वाही युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी दिली. तसेच तालुक्यातील अन्य जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शाहू छत्रपती महाराजांना साथ द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Advertisement

इंडिया आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारानिमित्त युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात जोरदार प्रचार दौरे करत आहेत. यात त्यांनी शिवराज महाविद्यालयाला भेट देण्यासह शेंद्री, माद्याळ, हसूरचंपू, हेब्बाळ, निलजी, नूल, जरळी या गावांत झंजावाती प्रचार दौरा केला.

Advertisement

यावेळी प्रा. किसनराव कुर्हाडे म्हणाले, कोल्हापूरचे छत्रपती घराणे नेहमीच सर्वसामान्य जनतेशी जोडले गेले आहे. शिवशाहुंच्या आचार विचारांचा वारसा शाहू छत्रपतींनी आपल्या सामाजिक कार्यातून जोपासला आहे. लोकशाही धोक्यात आल्यानेच ते स्वत? रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आपली असे समजून प्रत्येकाने कामाला लागावे.

गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या, गावोगावच्या प्रचार दौर्यात महिलांची मोठी संख्येने उपस्थिती, वाढता पाठिंबा हे शाहू छत्रपतींच्या विजयासाठी महिलांनी टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. देशाच्या पंतप्रधानानी मंगळसूत्राबाबत खालच्या पातळीवर टीका करून समस्त महिलांचा अपमान केला आहे. मंडलिकांना गेल्या निवडणुकीत आम्ही सहकार्य केले, त्यावेळी मी गडहिंग्लजची नगराध्यक्षा होते. पण त्यानंतर पाच वर्षात एकदाही मंडलिक आमच्या संपर्कात राहिले नाहीत. या निवडणुकीत त्यांना आणि भाजपला आम्ही जागा दाखवून देऊ.

पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण, हसूरचंपूच्या सरपंच प्रभावती बागी, उपसरपंच सचिन शेंडगे, माद्याळचे मनोज बोरगगल्ली, नूलच्या सरपंच प्रियांका यादव यांनी शाहू छत्रपतींना अधिकाधिक मते देण्यासाठी रात्रंदिवस राबणार असल्याचे ठामपणे सांगितले. यावेळी अॅड. दिग्विजय कुर्हाडे, डॉ. नाज खलिफा, महेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद तेली, मार्केट कमिटी माजी सभापती श्रीरंग चौगले, सूरज माने, अनंत पाटील, विनायक चौगले, विश्वजित सावंत यांचेसह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

 

Advertisement
Tags :
Gadhinglaj MIDCKolhapur LokSabhaprojects prosperity
Next Article