For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'खोक्या‘साठी तत्त्व सोडणारी ही मंडळी कसला विकास करणार- विजय देवणे यांचा सवाल

03:10 PM Apr 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
 खोक्या‘साठी तत्त्व सोडणारी ही मंडळी कसला विकास करणार  विजय देवणे यांचा सवाल
Vijay Devane
Advertisement

पिंपळगाव येथील प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; शाहू छत्रपतींच्या विजयात सिंहाचा वाटा उचलण्याचा निर्धार

पिंपळगाव प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षाच्या काळातील निक्रिय, अकार्यक्षम, नॉटरिचेबल खासदारांना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे, ‘खोक्या‘साठी तत्त्व सोडणारी ही मंडळी कसला विकास करणार? हा मोठा प्रश्न असे मत शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव व नाधवडे (ता.भुदरगड) येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

Advertisement

देवणे म्हणाले, देश व राज्यातील फोडाफोडीचे भाजपचे राजकारण सर्वसामान्य जनतेला रूचलेले नाही. साधी राहणी व उच्च विचारसरणी ही शाहू छत्रपतींची स्वभाववैशिष्ट्यो आहेत. राजेपण विसरून सामाजिक जाणिवेचे भान ठेवत संकटकाळी मदतीला धावणारे राजर्षी शाहू महाराज यांचे वारस असलेल्या शाहू छत्रपतींनीही सामाजिक बांधिलकीचे भान अखेडपणे जोपासले आहे. म्हणूनच त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावे.

आमदार जयंत आसगावकर म्हणाले, सध्याचे भाजप सरकार सर्वसामान्य समाजाच्या हिताचे सरकार नसून या सरकारने संविधान बदलण्याचा घाट घातला आहे. गेल्या 10 वर्षात देशाची दुर्दशा झाली असून देशाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचे कार्य काँग्रेस व इंडिया आघाडी हाती घेणार आहे. त्यासाठी कोल्हापूरची अस्मिता म्हणून ओळख असलेले शाहू छत्रपती यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करूया, यावेळी ए. वाय. पाटील म्हणाले, भुदरगडमधूनही मोठे मताधिक्य देण्यासाठी नेतेमंडळीनी दिवसरात्र काम करून मेहनत करावी.
यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले, भुदरगडमधून सर्व नेतेमंडळी एकसंधपणे प्रयत्न करून विद्यमान खासदारांना घरी बसविल्याशिवाय गप्प बसणार नाही.

Advertisement

या प्रचारसभेत काँग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई, सत्यजित जाधव, जीवन पाटील, सचिन घोरपडे यांची भाषणे झाली. यावेळी प्रकाशआण्णा देसाई, अशोकराव पाटील, राजू काझी, अतुल नलवडे, शिवाजीराव पाटील, दिलीप कदम, उदय पाटील, बाबुराव कांबळे, सौन्या आरडे, यावेळी संतोष मेंगाणे, अविनाश शिदे, भाकपचे सतिशचंद्र कांबळे, डी. एस. पाटील, नेताजी पाटील, संतोष मेंगाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. व्ही. देसाई, पी. एस. कांबळे, सरपंच शीतल पाटील, आबासो भोसले, कोमल सरदेसाई उपस्थित होते. आभार संजय सरदेसाई यांनी मानले.

Advertisement
Tags :

.