ही स्वाभिमानाची लढाई ! बाजीराव खाडेंचं बंड...उमेदवारी अर्ज भरताना अश्रू अनावर
तिकिट वाटपावेळी स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांना विचारात घ्यायला हवं होतं...काँग्रस हा लोकशाही मुल्यांची जोपासना करणारा पक्ष आहे मात्र अशा वेळी कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर मी कार्यकर्त्याच्या आवाजासाठी लढण्यासाठी मैदानात उतरत आहे. तसेच ही स्वाभिमानाची लढाई असून पक्षश्रेष्ठींना यातून एक संदेश देणार असल्याचं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बाजीराव खाडे यांनी म्हटलं आहे. यावेळी ते भावूक झाले आणि त्यांनी आपल्या आश्रूंना मोकळी वाट करून दिली.
पहा VIDEO>>> कोल्हापूर लोकसभेसाठी बाजीराव खाडेंची बंडखोरी; उमेदवारी अर्ज दाखल
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी आपली उमेदवारी दाखल केली. गेल्या काही वर्षापासून ते कोल्हापूरातून लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाककडून इच्छुक होते. मात्र त्यांना काँग्रेसचे तिकीट त्यांना न मिळता ते श्रीमंत शाहू महाराज यांना मिळालं. त्यामुळे नाराज झालेल्या बाजीराव खाडे यांनी आज थेट पक्ष नेर्तृत्वाला आव्हान देत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
यावेळी माध्यमांशी बोलताना बाजीराव खाडे म्हणाले, "गेली २८ वर्षे मी काँग्रेस पक्षाचं काम केलं आहे. राष्ट्रीय सचिव म्हणून मी अनेक राज्यांमध्ये काम केलं आहे. त्यामुळेकोल्हापूर लोकसभेसाठी मी सगळ्यात आधी काँग्रेसकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. प जागावाटपावेळी स्थानिक नर्तृत्वाने कार्यकर्त्यांना विचारात घेतलं नाही. केवळ सामान्य घरातील आहे म्हणून त्याची योग्यता नाकारली जात असेल तर त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्याचे मनोबल खच्ची होत आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे हा त्याचा अपमान आहे." असे त्यांनी म्हटले आहे.
अश्रू अनावर....ही लढाई स्वाभिमानाची
अर्ज दाखल करताना बाजीराव खाडे आज खुपच भावूक झाले होते. माध्यमाशी बोलताना त्यांनी आपल्या अश्रूंना वाट करून दिली. ते म्हणाले "ही प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाची लढाई आहे. आणि मला त्या कार्यकर्त्यांच्या वतीने ती लढायची आहे. म्हणून मी आज उमेदवारी अर्ज भरतोय." असे ते म्हणाले.