भाजपंच पहिल टार्गेट संविधान बदलणं; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आरोप
कोल्हापूरची जनता महाविकास आघाडी सोबत; दोनही उमेदवार विजयी होतील विश्वास केला व्यक्त
कोल्हापूर प्रतिनिधी
देशात भाजप पुन्हा सत्तेवर आली तर त्यांच पहिल टार्गेट हे संविधान बदलण्याचे असणार आहे. तसेच देशातील लोकशाही निमुटपणे संपविण्याचा डाव ही भाजपचा असल्याच आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यास त्यांना घटना बदलायची आहे. तसेच लोकशाहीही संपुष्टात आणायची आहे. भाजपचे हे कटकारस्थान देशातील नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला आणि देशात इंडिया आघाडीला चांगले वातावरण आहे. यंदाच्या निवडणुकीत देशात नक्कीच परिवर्तन पहायला मिळेल. भाजपचा घटना बदलण्याचा आणि लोकशाही संपविण्याचा डाव आम्ही कदापी यशस्वी होवू देणार नसल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, गेल्या अडीच वर्षातील खोके सरकारच्या काळात महाराष्ट्रात एकही उद्योग आला नाही. दिल्लीतून फोन आला आणि येथे येणारे उद्योग दबावाखाली गुजरातला गेले. आज येथील शेतकरी विविध समस्यांनी त्रस्त आहे. महिलांवर आत्याचार वाढत आहेत. पणे हे मिंदे सरकार काहीच करताना दिसत नाही. हे सरकार केवळ वाटाघाटी, देणं-घेणं यामध्येचे व्यस्त असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
कोल्हापूर जिल्हा महाविकाससोबत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कोल्हापूरवर विशेष लक्ष आहे, याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, कोल्हापूर हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. कोल्हापूरची सुज्ञ जनता हि महाविकास आघाडी सोबतच आहे. येथे कोणीही कितीही ठाणं मारलं तरी कोल्हापूरातून महाविकास आघाडीचे दोनही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.