कोल्हापूरात शिवसैनिक ताकदीने काम करतायत...मोठ्या मताधिक्य मिळणार
अभिजीत खांडेकर
हि निव़डणुक वैचारिक असून कोल्हापूरच्या जनतेने त्यासाठी शाहू महाराजांची निवड केली आहे. कोल्हापूरच्या मातीतील छत्रपतीचं व्यक्तिमत्व दिल्लीला पाठवायचं असा विचार जनतेने केली असून ऑलरेडी आमचा प्रचाराचा एक राऊंड पूर्ण झाला असल्याची कबूली काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे.
आपल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राजकिय परिस्थितीवर भाष्य़ केले. काँग्रेसकडून मान गादीला...मत गादीला अशा प्रकारचं कँपेनींग सुरू आहे. देशात सध्या गढूळ वातावरण निर्माण झालं असून अशा वातावरणात शाहू महाराजांच्या रूपाने निर्णयाक भूमिका लोकांमधून दिल्लीत जावी म्हणून ते लोकसभेच्या निवडणुकीला उभारले असून त्यामुळे मोठ्या मताधिक्यानं आपली सीट निवडून येणार असल्याचंही ते म्हणाले.
कोल्हापूरात शिवसैनिक ताकदीने काम करतायत...
कोल्हापूरात शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराजी असल्याच्या वृत्ताचे खंडन करताना आमदार सतेज पाटील यांनी सांगलीच्या जागेचे पडसाद कोल्हापूरमध्ये अजिबात नसल्याचं म्हटलं आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेना ताकतीने काम करत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील शाहू महाराजांना भेटून गेले. मधल्या काळात भाजपकडून याबाबतीत काही अफवा पसरवल्या गेल्या. पण त्यात काही तथ्य नाही.
याच विषयावर पुढे बोलताना त्यांनी, सांगलीबाबत वरिष्ठ पातळीकडून अजूनही आशावादी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य असली तरी वरिष्ठ पातळीवर काँग्रेस म्हणून आमचा प्रयत्न सुरू असल्याचा खुलासा त्यांनी केला.
वंचितने उमेदवार दिल्याने लवकरच निर्णय....
शिवसेनेने अद्याप हातकणंगलेची जागा घोषित केली नसून या जागेसंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरूच आहेत. महाविकास आघाडी म्हणून स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असून सर्वांचे मत राजू शेट्टींच्या बाजूने राहीलं पाहीजे असं आहे. मात्र तिथे वंचित बहूजन आघाडीने उमेदवार दिला असल्याने दोन दिवसांमद्ये त्याचा निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
साताऱ्याची जागा राष्ट्रवादीला गेली तर....
सातारा लोकसभा जागेसंदर्भातील तिढ्यावर बोलताना सतेज पाटीलांनी साताऱ्याची जागा राष्ट्रवादीला गेली तर साताऱ्यामधून उमेदवार निवडून आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचा महत्त्वाचा वाटा असेल. पुढील आठ दिवसात काय होईल एखाद्या सांगता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.