महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूर ब्रेकिंग : शाहू महाराजांनी शिवसेनेकडूनच निवडणूक लढवावी! शिवसैनिकांच्या मागणीची पोस्ट व्हायरल

09:07 PM Mar 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात महाविकास आघाडीतून शाहू महाराज छत्रपती कोणत्या तिकिटावर निवडणूक लढवणार हा सस्पेन्स कायम असतानाच आता शिवसैनिकाकडून सोशल मीडियावर जोरदार मोहीम राबवली जात आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये "आपलं कोल्हापूर हे आपलंच राहणार"... एकनिष्ठ शिवसैनिकच भगवा फडकवणार... अशा अशाय असल्याचे पाहायला मिळत आहे.

Advertisement

महाविकास आघाडी मधील जागा वाटपाच अंतिम टप्प्यात असताना कोल्हापूरचा तिढा अजून कायम दिसत आहे. काँग्रेसने जरी कोल्हापूरच्या लोकसभा जागेची मागणी केली असली तरी शिवसेना अद्याप ही जागा सोडायला तयार नाही. कालच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरची जागा ही शिवसेनेचीच असून ती आपल्याकडेच ठेवण्यासाठी कोल्हापुरातील शिवसैनिकांचा दबाव असल्याचं म्हटले होते. तसेच शाहू महाराजांनी जर ठाकरे गटाची मशाल हाती घेतली तर संपूर्ण महाराष्ट्र उजळेल अशा आशयाचे सूचक विधान केले होते. पण गेल्या दोन दिवसापासून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसचे लोकसभेचे तिकीट शाहू महाराजांना फायनल झाल्याचा दावाही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरातील ठाकरे गट शिवसैनिक आक्रमक झाला आहे. सोशल मीडियावर शिवसैनिकांकडून मोहीम चालवताना कोल्हापूरची जागा शिवसेनेकडेच ठेवावी यासाठी मागणी करून वरिष्ठांवर अप्रत्यक्षपणे दबाव आणला जात आहे.

Advertisement

याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याकडून ही पोस्ट टाकल्यामुळे आता अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या पोस्टमध्ये "आपलं कोल्हापूर हे आपलंच... एकनिष्ठ शिवसैनिकच भगवा फडकवणार..." असा विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे कोल्हापूरच्या जागेचा तिढा मिटणार की आणखीन चिघळणार हे लवकरच पाहायला मिळणार आहे.

Advertisement
Tags :
Kolhapur Lok Sabha politics Shivsena Congress
Next Article