छत्रपती घराण्यानं राजर्षी शाहूंच्या नावाला साजेस काय काम केलं ? विरेंद्र मंडलिक यांची जोरदार टिका
कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आतापर्यंत काय केलं शाहू महाराजांच्या नावाला साजेस कोणतं काम सध्याच्या छत्रपती घराण्यांना केलं आहे असा प्रश्न विचारून त्यांना एखादा उद्योगही उभारता आला नाही. जे काही केलं ते कागलच्या घाटगे घराण्यानं केलं असल्याचा असल्याचे वादग्रस्त विधान महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी केलं आहे. त्यांच्या या वादाने विधानाने एका नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पहा VIDEO >>> छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेस काम केलं नाही-वीरेंद्र मंडलिक
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून महायुतीचे विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रचारसभेचा धुरळा आता उडाला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. आरोप आणि टीका आता वैयक्तिक पातळीवर आली आहे.
महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी त्यांचे पुत्र वीरेंद्र मांडलिक यांची कागलमध्ये प्रचारसभा झाली. या प्रचार सभेमध्ये शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे अध्यक्षस्थानी होते. समरजीत घाटगे यांच्यासह महायुतीचे कागलचे अनेक नेते या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित होते. या व्यासपीठावरून बोलताना वीरेंद्र मंडलिक यांनी छत्रपती घराण्यावर थेट टीका केली. ते म्हणाले सध्याच्या छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेस कोणतच काम केलेलं नाही. त्यांनी त्यांना एखादा उद्योगही उभा करता आला नाही जे काही केलं ते शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे विक्रमसिंह घाटगे आणि त्यांच्या पश्चात समरजीत घाटगे यांनीच केलं आहे.
आपली टिका पुढे चालु ठेवताना त्यांनी, सध्याच्या छत्रपती घराण्याला राजश्री शाहू महाराजांच्या नावाने एखादा उद्योगही सुरू करता आला नाही तसेच 12 ते 15 वर्ष बंद पडलेली शाहू मिल देखील त्यांना सुरू करता आली नसल्याचा आरोप केला. समरजीत घाटगे यांना उद्देशून बोलताना वीरेंद्र मंडलिक यांनी राजर्षी शाहू महाराजांचे खरे जनक वारसदार समरजीत घाटगे तुम्हीच आहात असं म्हटलं आहे. वीरेंद्र घाटगे यांच्या या टीकेमुळे आता एका नव्या वाघाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.