Kolhapur Crime | कोल्हापूर एलसीबीची मोठी कारवाई; घरफोडी करणारी सराईत टोळी जेरबंद!
उजळाईवाडी हायवेवर तीन चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कोल्हापूर -जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १०० ग्रॅम सोने, २३० ग्रॅम चांदी आणि वाहनांसह एकूण २,४५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या अटकेमुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
तपास सुरू असताना, संशयित आरोपी रज्जाक मुजावर हा आपल्या साथीदारासह चोरीचे दागिने विकण्यासाठी उजळाईवाडी येथील पुणे-बेंगलोर हायवेवर येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार समीर कांबळे व राजू कोरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे दि. २५ मार्च २०२६ रोजी पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी खालील तीन आरोपीना अटक केली आहे
या टोळीने गडहिंग्लज (२ गुन्हे), आजरा (२ गुन्हे), भुदरगड, चंदगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोया केल्याची कबुली दिली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार आणि आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने पार पाडली.
रज्जाक अस्लम मुजावर (वय २६, रा. नांद्रे, जि. सांगली). तेजस तानाजी पाटील (वय २८, रा. कोरीवडे, ता. आजरा). विनायक सिताराम हरेर (वय ३२, रा. हत्तीवडे, ता. आजरा). चौकशीतून गेल्या ३-४ महिन्यांत त्यांनी केलेले ७ गुन्हे समोर आले आहेत.