कोडोलीत रात्रीत 2 दुकाने फोडली; रोख रक्कमेसह 1 लाखांची चोरी
वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ता. पन्हाळा येथील पोखले फाट्यावरील पानपट्टी, तेथून जवळ असलेला गायत्री बझार रात्रीत फोडून रोख रक्कम, बझार व पानपट्टीतील विक्रीचे साहित्य अशा एक लाख रुपये च्या मुद्देमालावर चोरट्यानी डल्ला मारत सराईत चोरटे असल्याची चुनूक दाखवली.
गुरुवार दि. २२ रोजी रात्रीच्या वेळी या चोऱ्या झाल्या आज शुक्रवारी सकाळी चोरी झाल्याचे लक्षात आले त्यावेळी पासून पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.
घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी गायत्री बझारचे मालक अभिषेक उत्तम मतसागर यानी दिलेल्या माहिती नुसार शटरची पट्टी कट करून चोरट्यानी बझार मध्ये प्रवेश केला तोंडावर बांधलेला रुमाल व अंगात स्वेटर घातलेले चोरटे बझारच्या आतील बाजूस असलेल्या सिसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत आहेत बझारच्या बाहेरील बाजूने असलेल्या सिसीटीव्ही चे तोंड चोरट्यांनी फिरवून ठेवले होते कॅश काऊंटर मधील रोख ३५ हजार व ४ हजारांचे बाझार मधील साहित्य चोरट्यांनी पोत्यात भरून लंपास केलेचे सिसीटीव्हीत कैद झाले आहे.
याच परिसरात मुख्य मार्गावर असलेल्या पानपट्टी च्या पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीतून रॉड टाकून दरवाजाची आतील बाजूची कडी काढून पानपट्टी तील रोख १५ हजार रुपये, एक मोबाईल सह सिगारेट , बिस्कीट चे बॉक्स,थंड पेय बॉक्स आदी साधारण ६० हजाराचे साहित्य लंपास केले. चोरट्यांनी ओळख पेटू नये म्हणून पानपटीत असलेल्या कॅमेऱ्याचे वायरींग कट केले होते. गेल्या १५ दिवसांपूर्वी ही याच पानपट्टीत चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
पोखले फाटा टार्गेट ...
पोखले फाट्या पासून पोलीस ठाणे ५० मिटर अंतरावर आहे काही दिवसापूर्वी याच परिसरातील वाईन शॉपीचा दरवाजा उचकटून रोख रक्कम लंपास केली होती. गुरुवारीही एकाच रात्रीत दोन ठिकाणी याच परिसरात चोऱ्या झालेने नागरीकांच्यात घबराट निर्माण झाली आहे. चोरट्यांनी सीसीटीव्हीत कैद होवू नये म्हणून कॅमेरा फिरविले तसेच वायरिंग कट करतात यावरून ते सराईत चोरटे असलेची चर्चा असून त्यांनी पोखले फाटा परिसर टार्गेट केले आहे. याप्रकरणी कोडोली पोलीसांच्या कडून शुक्रवार दि.२३ रोजी रात्री उशिरा पर्यंत तपास व अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.