कसबा बीड येथे शिवयोगी मठ ते चर्मकार वस्ती रस्त्याचे उद्घाटन; गिरीश महाजन फंडातून 25 लाखाचा निधी
कसबा बीड/ वार्ताहर
कसबा बीड तालुका करवीर येथे शिवयोगी मठ ते चर्मकार वस्ती या पाणंद रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करण्यासाठी व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले , कसबा बीड हे सोन्याचा पाऊस पडणारे गाव म्हणून करवीर काशी ग्रंथात उल्लेख असणारे गाव आहे. करवीर तालुक्यासाठी कोणतेही पद नसताना वेगवेगळ्या फंडातून 5 कोटी भाजपा पक्षाकडून करवीर विधानसभा मतदार संघासाठी उपलब्ध करून घेतला आहे. यापैकी कसबा बीड गावासाठी 25 लाख गिरीश महाजन फंडातून मिळालेल्या रस्त्याचे उद्धाटन करत आहे. वृक्षारोपण, कोरोना काळात आरोग्य योजना आदी सामाजिक कार्याचा ध्यास घेऊन आपण वाटचाल करीत आहे असेही श्री. घोरपडे यांनी सांगितले.
या उद्धाटन कार्यक्रमामध्ये शिरोली दुमाला लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील यांनी गावाच्या विकासासाठी काम करताना सर्वांना बरोबर घेऊन जावे लागते, तरच विकास होतो. त्यासाठी सर्वांनी मिळून मिसळून काम करूया असे मनोगतात सांगितले. बीड गावचे माजी लोकनियुक्त सरपंच व गोकुळ संघाचे माजी संचालक सत्यजीत पाटील यांनी आपण 2017 ला सरपंच असताना हा रोड होण्यासाठी प्रयत्न केले होते ते आज पूर्ण झाले आहे. या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष मोरे यांचे या अगोदर व आतासुद्धा विशेष सहकार्य लाभले. संतोष मोरे यांच्या पाठपुराव्याने व संताजी घोरपडे यांच्या प्रयत्नाने आपल्या गावासाठी 25 लाख फंड दिला याबद्दल त्यांचे कौतुक केले.
यावेळी कसबा बीड गावचे लोकनियुक्त सरपंच उत्तमराव वरुटे , उपसरपंच जयसिंग सूर्यवंशी ,शिरोली दुमालाचे लोकनियुक्त सरपंच सचिन विश्वासराव पाटील,माजी सरपंच व गोकुळचे दूध संघाचे माजी संचालक सत्यजित पाटील,सर्जेराव सूर्यवंशी , सर्जेराव तिबिले , पंडित मोरे , राकेश वरुटे,अमित वरुटे , शेतकरी नेते मुंकुंदराव पाटील , उद्योजक प्रताप पाटील सामाजिक कार्यकर्ते संतोष मोरे आदी उपस्थित होते.या उद्घाटन कार्यकर्माचे प्रास्ताविक व स्वागत लोकनियुक्त सरपंच उत्तमराव वरुटे यांनी व आभार पांडूरंग जाधव यांनी आभार व्यक्त केले आहे.