मागणी पुर्ण करा आणि मगच कारखाने सुरु करा! कळे परिसरातील शेतकऱ्यांनी गट ऑफिसला ठोकले ताळे
उत्रे/ प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसरा हप्ता 400 रुपये आणि यावर्षी च्या हंगामाचा दर 3500 रूपये जाहीर करावे या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरनंतर सुरु झालेले कारखाने बंद करण्यासाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी गट ऑफिसच्या दारात आंदोलन करत आहेत.
पन्हाळा तालुक्यातील कळे येथील गट डी. वाय पाटील ऑफिसला आज शरद जोशी शेतकरी संघटनेकडून टाळे लावण्यात आले. मागील 400 रूपयाचा हप्ता आणि यावर्षीचा उसदर जाहीर करूनच कारखाना सुरु करण्याची मागणी शेतकऱी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. याच बरोबर दालमिया शुगर, कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना व पद्मश्री डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना या कारखान्यांना शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गट ऑफिसला टाळे लावण्याचे आंदोलन घेण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र शरद जोशी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव कोलोलीकर, आनंदा मगदूम, सरदार पाटील, अरविंद पवार, दीपक पवार, प्रकाश पाटील, बाजीराव पवार, बनाबाई पाटील, भाग्यश्री गुरव, सुलाबाई पाटील, अनिता पाटील, अलका पाटील, फुलाबाई पाटील, मंगेश सुतार, वसंत कोल्हे, अमोल पवार, बापू माळुंगेकर, श्रीपती पाटील उपस्थित होते.