For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकारणात प्रंचड उलथापालथ होणार...भगव्याचं राज्य येणार...पट्टणकडोलीत फरांडेबाबांची भाकणुक

07:42 PM Nov 01, 2023 IST | Abhijeet Khandekar
राजकारणात प्रंचड उलथापालथ होणार   भगव्याचं राज्य येणार   पट्टणकडोलीत फरांडेबाबांची भाकणुक
Pattankadoli Yatra
Advertisement

विठ्ठल-बिरदेव यात्रेला उत्साहात सुरवात

उचगाव/प्रतिनिधी

शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मधील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल- बिरदेव यात्रेला आजपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. सुमारे 8 ते 10 लाख भाविक पट्टणकोडोलीमध्ये बिरदेव यात्रेसाठी दाखल झाले आहेत. या अभुतपुर्व यात्रेमध्ये खारीक, खोबरे, भंडाऱ्याची मुक्त उधळली केली जात आहे.

Advertisement

पहा VIDEO >>> राजकारणात प्रंचड उलथापालथ होणार...भगव्याचं राज्य येणार...पट्टणकडोलीत फरांडे बाबांची भाकणुक

राज्यात मोठी खळबळ होईल, रोहिणीत गडगडाट, मिरगात पेरणी देशात होईल, तांबडं,रस भांडे महागणार, मिरची महागणार, रोगराई कानान ऐकाल, डोळ्यांनी दिसणार नाही, बाळगोपाळ सुखी ठेवील अशी भाकणूक फरांडेबाबा तात्यादेव वायकुळे यांनी वसगडे ता.करवीर येथे विठ्ठल-बिरदेव यात्रेत पालखी उत्सवासमोर केली.

Advertisement

तात्यादेव वायकुळे (फरांडेबाबा) हे शिरसाव (ता. परांडा) येथील आहेत. ते वाकडी, कासेगाव, गुंडवाडीमार्गे वसगडे येथे आले. तलवारीचे पूजन पोलीस पाटील संजय पाटील यांच्या हस्ते झाले. गावातील समस्त धनगर समाज ,मानकरी, ग्रामस्थ यांच्या समवेत ते वाजत गाजत आले. यावेळी ढोलाच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला. भाविकांनी लोकर व पैशाची उधळण केली. त्यानंतर दोन वाजता फरांडेबाबा 'हेडाम' सोहळ्यात हातात तलवारी घेऊन पोटावर वार करीत मंदिरात आले व भाकणूकीस प्रारंभ झाला. यावेळी भंडाऱ्याच्या उधळणीने आसमंत पिवळा धमक झाला होता.

या सोहळ्यानंतर फरांडेबाबानी अघोळ करून २१ दिवसाचा उपवास सोडला. दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजता मानाची पहिली पालखी व ऊस गाड्यांची मिरवणूक खारीक व खोबऱ्याच्या उधळणीत काढण्यात आली. यावेळी ऊस गाड्यांची लूट करून भाविकांनी उसाचा आस्वाद घेतला. मिठाई, विविध वस्तु घोंगडी, स्वेटर, खाद्य पदार्थ आदी वस्तुंचे स्टॉल सजले होते.

यात्रेचा प्रमुख सोहळा पार पाडण्यासाठी सरपंच योगिता बागडी, पोलीस पाटील संजय पाटील,यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, धनगर समाज, मानकरी, तंटामुक्तीचे अध्यक्ष , तलाठी, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. गांधीनगरचे साहाय्यक पोलीस निरिक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

फरांडेबाबांनी डोळे दिपवणारे हेडाम नृत्य करून भाकणूक भाकणुक केली. फरांडे बाबांनी येत्या वर्षाभरात काय होणार याचा अंदाज वर्तवला. त्यानुसार त्यांनी राजकारणात प्रंचड अस्वस्थता आणि गोंधळ होऊन राजकिय उलथापालथ होईल असे म्हटले आहे. तसेच भगव्याच राज्य येऊन बळीराजाला सुखाचे दिवस येतील, महागाई शिगेला पोहचेल, समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल होईल, जगात भारत देश महासत्ता बनेल असे भाकित केले.

या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, उत्तर प्रदेशातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेदरम्यान सकाळपासूनच विधिवत कार्यक्रमांना सुरुवात झाली असून परपरेनुसार कर्नाटकातील विजापुरहुन आदिलबादशहाचे बाशिंग श्रींचरणी अर्पण करण्यात आले आहे. यावेळी हेडाम नृत्य करत फरांडेबाबा खेलोबा वाघमोडे यांनी ही भाकणुक केली आहे. यावेळी जवळपास 70 टन भंडारा, खारीक, खोबऱ्याची उधळण या यात्रेत करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.