महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Breaking : राजू शेट्टी यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार..? कोल्हापूरातील बैठकीत निर्णय

01:22 PM Mar 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
Kolhapur Hatkanangle
Advertisement

लोकसभेच्या तोंडावर राजकिय घडामोडी तिव्र होत असताना हातकणंगले मतदारसंघातून आता नविन बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीमध्ये राजू शेट्टी सामिल होण्यावरून राजू शेट्टी यांनी नकार दिल्यानंतर आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी विरोधात उमेदवार उभा करण्याचा ठराव कोल्हापूरात पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकिमध्ये झाला आहे. जयंत पाटील, आमदार सतेज पाटील आणि संजय पवार यांच्यासह जिल्ह्यातील आघाडीच्या अनेकांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली.

Advertisement

भाजप विरोधात आघाडी भक्कम करण्यासाठी महाविकास आघाडी अनेक छोट्या मोठ्या पक्षांना एकत्रित करत असतानाच स्वभिमानी शेतकरी संघटनेने सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सामिल व्हावे अशी खुली ऑफर राजू शेट्टी यांना दिली होती. त्यानंतर राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. त्यांनतर झालेल्या घडामोडीमध्ये राजू शेट्टी यांनी महाविकास आणि महायुती या दोन्ही आघाड्यांसोबत न जाण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या पासून अंतर ठेवले. राजू शेट्टी जर आमच्या बरोबर आले तर हातकणंगले मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडण्यात येऊन महाविकास आघाडी त्यांच्या विरूद्ध उमेदवार देणार नाही असेही मविआने घोषित केले होते.

Advertisement

दरम्यान, हा त्यांचा निर्णय असून माझ्याविरूद्ध उमेदवार उभा करायचा कि नाही हे त्यांनी ठरवाव. पण मी महाविकास आघाडीबरोबर जागणार नाही अशी भुमिका राजू शेट्टी यांनी वेळोवेळी घेतली. एव्हढेच नाही तर पण महाविकास आघाडीने आपल्याला बाहेरून पाठींबा द्यावा अशी मागणी केली होती.

आज कोल्हापूरात महाविकास आघाडीची आढावा बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये महाविकास आघाडी हातकणंगले मध्ये आपला उमेदवार उभा करेल असा ठराव करण्यात आला आहे. य़ा ठरावामुळे प. महाराष्ट्रातील राजकिय राजकिय गणित पुन्हा मांडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत असल्याची छलक पहायला मिळत आहे.

 

Advertisement
Tags :
HatkananglekolhapurMVARaju Shettytarun bharat news
Next Article