For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेरोजगारीच्या नैराश्यातून तरूणाची आत्महत्या; गणेशवाडी येथील दुर्दैवी घटना

09:10 PM May 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
बेरोजगारीच्या नैराश्यातून तरूणाची आत्महत्या  गणेशवाडी येथील दुर्दैवी घटना
Advertisement

कसबा बीड / वार्ताहर

Advertisement

गणेशवाडी (ता.करवीर) येथील युवकाने नोकरी मिळत नाही. या नैराश्यातून आत्महत्या केली. ऋषिकेश धनाजी माने (वय २३) असे त्या युवकाचे नाव आहे.

गरीबीला कंटाळून व नोकरी मिळत नाही या कारणामुळे त्याने यापूर्वी ही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. असे कुटुंबातील लोकांनी सांगितले होते. तो एका हाँटेलमध्ये कामाला होता. तीन दिवसांपूर्वी त्याने विष प्राशन केले होते. सीपीआर रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते आज त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबातील सदस्यांनी ताब्यात घेतला. याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्याच्या मागे आई वडील, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार (ता.२०) रोजी सकाळी आहे.

Advertisement

Advertisement

.