For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूर- गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग आजही वाहतुकीसाठी बंदच

11:06 AM Jul 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
कोल्हापूर  गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग आजही वाहतुकीसाठी बंदच
Advertisement

प्रशासनाचा निर्णय; पोलीस गुन्हा दाखल करणार

वाकरे । प्रतिनिधी

कोल्हापूर- गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर दोनवडे ते बालिंगे दरम्यानच्या रस्त्यावर सुमारे दीड ते दोन फूट पाणी असल्याने सोमवारी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.तसेच पुरातून वाहन चालवल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या आज सकाळी ६ वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रस्ता सुरु करण्यासाठी आज सायंकाळी निर्णय होण्याची शक्यता आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला कोल्हापूर गगनबावडा रोड आजही वाहतूकीसाठी बंद राहणार असल्याचं प्रशासनाने जाहीर केले आहे. या पूलावरती एक ते दिड फूटापर्यंत पाणी असल्याने प्रशासनाडून हा निर्णय घेतला असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून समजते आहे. हा नियम मोडून वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून जाहीर केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.