कोल्हापूरच्या एका चाहत्याने ३ दशकांपूर्वी उभारला शोमॅनचा पुतळा
कोल्हापूर
कोल्हापूर हे कलापूर म्हणून सर्वश्रुत आहे. कोल्हापूरचे कलाक्षेत्राशी एक वेगळेच नाते आहे. इतिहासातील अनेक कलाकृतींशी या शहराची नाळ जोडलेली आहे. आज भारतीय चित्रपट सृष्टीचा शोमॅन राज कपूर यांची जन्मशताब्दी आहे. यानिमित्त कपूर कुटुंबियांसह अनेक ठिकाणी राज कपूर यांचे चाहते हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत.
कोल्हापूरचे संभाजी पाटील हे राज कपूर यांचे कट्टर चाहते. त्यांचे अनेक किस्से कोल्हापरकरांच्या आठवणीत आहेत. या चाहत्याच्या अफाट प्रेमाचे उदाहरण म्हणजे कोल्हापूरातील राजकपूर यांचा पुतळा. रंकाळा तलावाला लागून शोमॅन राजकपूर यांचा पुतळा त्यांच्या या चाहत्याने ३० वर्षांपूर्वी उभारला आहे. ४ जानेवारी १९९५ साली या पुतळ्याची उभारणी करण्यात आली. या पुतळ्याच्या उद्घाटनाला शशी कपूर उपस्थित होते. या पुतळ्याला राजीव कपूर, रणधीर कपूर, सुनील दत्त आदींनी भेट दिली आहे. संभाजी पाटील यांच्या या फॅन मुव्हमेंटनंतर कपूर कुटुंबियांनी त्यांचा एक घरोबा निर्माण झाला. राम तेरी गंगा मैली या सिनेमाच्या रिलीज ला स्वतः राज कपूर कोल्हापूरात आले होते. तेव्हापासून राज कपूर आणि कोल्हापूरच एक अनोखं नातं जपलं गेलं.