For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक 'महिला पर्यटन धोरण' अंमलबजावणी राबवणार!

01:18 PM Mar 03, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक  महिला पर्यटन धोरण  अंमलबजावणी राबवणार
Advertisement

                    केडीसीसी बँकेचा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढाकार

Advertisement

कोल्हापूर -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक महाराष्ट्र शासनाचे आई हे महिला पर्यटन धोरण राबविणार आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला पाठबळ देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला. बँकेचे अध्यक्ष आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या धोरणामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये महिला सहभागाला चालना मिळणार आहे.

पर्यटनव्यवसायातील. १५ लाखांपर्यंत कर्जाचा ब्याज परताबाही मिळणार आहे.या योजनेंतर्गत महिलांनी पर्यटन व्यवसायासाठी रूपये १५ लाखापर्यंतचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जावरील व्याज परतावा हा बँक नियमाप्रमाणे पर्यटन संचालनालयाकडून दिला जाणार आहे. महिला उद्योजकता विकास महिलांसाठी पायाभूत सुविधा महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने, सवलती प्रवास आणि पर्यटन विकास ही पंचसूत्री आहे.

Advertisement

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र सरकारने महिला केंद्रीत असे महिला पर्यटन धोरण बनवलेले आहे. हेच धोरण केडीसीसी बँकेने जिल्हाभर राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या धोरणाच्या माध्यमातून महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग आणि त्यांच्या आर्थिक विकासाचा स्तरही उंचावेल. या धोरणाच्या माध्यमातून केडीसीसी बँक जिल्ह्यातील महिलांना नवीन उद्योगांकरीता व जुना व्यवसाय वाढविण्याकरीता प्राधान्य देणार आहे.

Advertisement
Tags :

.