Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टर आज संपावर, काय आहे कारण?
त्यामुळे गुरुवारी 18 रोजी राज्यस्तरीय संपाची हाक दिली आहे
कोल्हापूर : शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅ थिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाला भारतीय वैद्यकीय संघटना महाराष्ट्र राज्याने तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे गुरुवारी 18 रोजी राज्यस्तरीय संपाची हाक दिली आहे.
यामध्ये जिह्यातील सुमारे 2 हजार 600 हून अधिक डॉक्टर तसेच सीपीआरमधील 400 डॉक्टर सहभागी होणार आहेत. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी यांनी सांगितले की, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेटने राज्यातील सर्व असोसिएशनना संपात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार जिह्यातील सुमारे 2 हजार 500 डॉक्टर ओपीडी बंद ठेवून संपात सहभागी होणार आहेत. मात्र, अतिगंभीर रुग्णांसाठी आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीपीआर मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. उत्कर्ष देशमुख म्हणाले, 'गुरुवारी सकाळी आम्ही सर्व वॉ र्डचे राऊंड घेऊन संपात सहभागी होणार आहोत. यात निवासी डॉ क्टर २००, अंतरवासिता १५० आणि वरिष्ठ निवासी ५० डॉ क्टरांचा सहभाग असणार आहे. आमच्या मागण्यांसाठी आम्ही संपात सहभागी होत आहे. तरीही सीपीआरमधील आपत्कालीन सेवा अखंड सुरू राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.