For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; दानोळीत सराईत गुन्हेगार महेश दळवी यांची हत्या

01:03 PM Oct 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार  दानोळीत सराईत गुन्हेगार महेश दळवी यांची हत्या
Advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे भरदिवसा गोळीबार करून महेश बजरंग दळवी (वय ४३) यांची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. चांदोली वसाहत परिसरात सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे दानोळीसह परिसरात खळबळ उडाली असून, हल्लेखोरांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मागून येऊन हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

मिळालेल्या माहितीनुसार, महेश दळवी हे शेताकडे जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर मागून गोळीबार केला. डोक्यात आणि मानेवर गोळ्या लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Advertisement

जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय

महेश दळवी यांची पोलिसांच्या नोंदीत सराईत गुन्हेगार म्हणून नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याविरोधात हत्येसह विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही हत्या जुन्या वादातून झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, रुग्णालय परिसरात दळवी यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.

Advertisement

भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे दानोळी गावासह शिरोळ तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. हल्लेखोरांची ओळख, हत्येमागील कारण आणि संभाव्य पूर्ववैमनस्य यांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisement
Tags :

.