For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vari Pandharichi 2025: आनदें भरीन तिन्ही लोक.. जाईन गे माये तया पंढरपुरा, दिंड्यांचे प्रस्थान

01:59 PM Jun 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
vari pandharichi 2025  आनदें भरीन तिन्ही लोक   जाईन गे माये तया पंढरपुरा  दिंड्यांचे प्रस्थान
Advertisement

कोल्हापूरच्या आजूबाजूंच्या गावांमधील दिंड्यांनीही पंढरीकडे प्रयाण आहे

Advertisement

कोल्हापूर : अवघाची संसार सुखाचा करीन... आनदें भरीन तिन्ही लोक... जाईन गे माये तया पंढरपुरा... भेटेन माहेरा आपुलिया... सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन... बाप रखुमाहेविवरु विठ्ठलाला भेटीन... यासह अनेक अभंग आणि भजनं म्हणत शनिवारी उत्तरेश्वर विठ्ठल मंदिर व आनंदी महाराज मठ ट्रस्टबरोबर दिंड्या ६ जुलै रोजीच्या आषाढी एकादशीदिनी लाडक्या विठूरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला रवाना झाल्या.

सोबत कोल्हापूरच्या आजूबाजूंच्या गावांमधील दिंड्यांनीही पंढरीकडे प्रयाण आहे. या सर्व विंड्यामध्ये दीड ते दोन हजारावर वारकरी आहेत. हे सर्वजण पंढरीच्या वाटेवरचा परमोच्च आनंद अनुभवताना वाट तुडवत तुडवत पुढे जाताना माऊली माऊली, ज्ञानबा-तुकारामचा अखंड गजर केला जात आहे.

Advertisement

दिवसभर उन्ह पावसाचा खेळ सुरू होता. मध्येच येणारी पावसाची सर अंगावर घेत वारकरी मंडळी पंढरीच्या दिशेने वाट तुडवत आहेत. रोज किमान २५ ते ३० किलो मीटरचा पायी प्रवास करण्याचे नियोजन केले आहे. रात्रीच्या विसाव्याच्या ठिकाणी जाण्याचे संपूर्ण नियोजन दिंडीकरांनी केलेले आहे.

इतकेच नव्हे तर जेवणापासूनच्या वस्तूंसह रात्रीच्या निद्रेसाठी लागणारा सर्व बोजाबिस्तारा सर्वांनी घेतला आहे. तो एका वाहनात ठेवून दिंडीकर पंढरीकडे निघाले आहेत. दिंड्यांमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंतच्या सर्व वयोगटातील वारकऱ्यांचा सहभाग आहे. दरम्यान, पंढरीकडे निघालेल्या उत्तरेश्वर विठ्ठल मंदिर व आनंदी महाराज मठ ट्रस्टच्या दिंडीचे यंदाचे ३३ वे वर्ष आहे.

सकाळच्या रम्य वातावरणात उत्तरेश्वर विठ्ठल मंदिराजवळच मान्यवरांच्या हस्ते वीणा पूजन करुन दिंडीला सुरुवात केली. यानंतर वीणा हाती घेतलेले दिंडी प्रमुख ज्ञानेश्वर ऊर्फ नाना पाटील यांच्यासह कपाळी केशरी गंध लावलेले दीडशेहून अधिक वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.

कोल्हापूरमधून पायी दिंड्या कोल्हापूरकडे रवाना

कोल्हापूर : आषाढी एकादशीच्या वारीसाठी वारकरी मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने पंढरपूरकडे पायी निघाले आहेत. शहरातून सकाळी पावस वरुन आलेली पायी दिंडी पुढे गेली त्यापाठोपाठ भुये, भुयेवाडी, आसुर्ले, दरेवाडी, नागदेववाडी, केर्ले, फुलेवाडी, कुंभार मंडप आदी दिंड्या शुक्रवारी पंढरपूर कडे रवाना झाल्या.

पंढरपूरच्या वारीसाठी कोल्हापूरसह जिल्ह्यातील अनेक वारकरी वारीत सहभागी होत असतात. शुक्रवारी अनेक दिंड्या शहरातून किंवा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. यावर्षीची आषाढी एकादशीची वारी ६ जुलै रोजी आहे. त्यामुळे, वारकरी आतापासूनच पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत.

त्यामुळे, वारकरी आतापासूनच पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. पायी चालताना वारकरी विठ्ठलाच्या भजनांमध्ये तल्लीन होऊन जातात आणि 'ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात. या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे दिंडी मार्गावर स्वागत केले जात आहे.

कसबा बावडा : भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीनिमित्त कसबा बावडा येथील पायी दिंडी शनिवारी पंढरपूरकडे रवाना झाली. शनिवारी सकाळी आठ वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून पायी दिंडीला प्रारंभ झाला. यावेळी शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते वीणा पूजन केले.

माजी नगरसेवक मोहन सालपे, श्रीराम सोसायटीचे उपसभापती अनंत पाटील, युवराज उलपे, मिलिंद पाटील, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर कमिटीचे अध्यक्ष तानाजी चव्हाण यांच्या हस्ते आरती केली. वारकरी राजाक्का निर्मळे आणि पवित्रा बरगे यांनी विडी मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या.

बावड्यातील मुख्य मार्गावरून निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी येथील शिवसेनेच्या शाखेतर्फे नाश्त्याची सोय केली होती. मुस्लिम समाजच्या वतीने चहा पाणी दिले. दिंडी मुख्य मार्गावरून भगवा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि येथील रेणुका मंदिरात आरती करून मार्गस्थ झाली.

Advertisement
Tags :

.