For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Breaking : सायबर चौकामध्ये थरार! भरधाव कारने ६ जणांना चिरडले; तिघांचा मृत्यु

05:30 AM Jan 01, 1970 IST | Abhijeet Khandekar
kolhapur breaking   सायबर चौकामध्ये थरार  भरधाव कारने ६ जणांना चिरडले  तिघांचा मृत्यु
Advertisement

पुण्यापाठोपाठ आता कोल्हापूरातही भरधाव वाहनाच्या झालेल्या अपघाताने महाराष्ट्र हादरला आहे. कोल्हापूरातील सायबर चौकात झालेल्या या अपघातामध्ये तीन दुचाकीवरील ६ जणांना गाडीने उडवले असून यामध्ये तिघांचा जागीच मृत्यु झाला आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू वसंत मारूती चव्हाण यांच्या कारने हा अपघात घडून आला आहे. अपघाताचा व्हिडीयो सोशल मीडीय़ावर प्रचंड व्हायरल झाला असून अपघात स्थळाचे चित्र प्रचंड भीषण होते.

Advertisement

कोल्हापूर शहरातील शिवाजी विद्यापीठाला लागून असलेल्या सायबर चौक आज अपघाताने हादरला. नेहमी वर्दळ असलेल्या या चौकातून शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू वसंत मारूती चव्हाण हे राजाराम कॉलेजकडून माऊली चौकाकडे जात होते. यावेळी चौकाच्या अलीकडेच त्यांचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव कारने रस्त्यावरील तीन दुचाकींना पाठीमागून जोरात धडक देऊन उडवले. पाठीमागून जोरात धडक बसल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले त्यांना दवाखान्यामध्ये नेण्यापुर्वीच त्यांचे निधन झाले. तर कारचालकाचा जागीच मृत्यु झाला.

या अपघाताचा व्हिडीयो सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या अपघाताची दृष्ये इतकी भयानक आहेत कि बघणाऱ्याला धडकी बसल्याशिवाय राहत नाही. या अपघातामध्ये २ तरूणांचा जागीच मृत्यु झाला असून त्यामुळे जिल्ह्याभरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.