राधानगरी येथील चोरीचा पोलिसांकडून छडा, चोरीस गेलेला 6 लाख 78 हजार किंमतीचे सोने जप्त
राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी येथील पोलीस स्टेशनसमोर असलेल्या शेटकेवाङीत गेल्या आठवड्यात सचीन पांङूरंग वागवेकर यांच्या घरातील असणारे 8 लाख 47 हजार 750 रूपये रक्कमेचे सोने चांदीचे दागिने मोबाईल फोन व रोख रक्कम चोरीस गेली होती. त्याचा छङा राधानगरी पोलिसांनी लावून हा मूद्देमाल हस्तगत केला असून दोन अट्टल चोरट्यांना राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे,
या गून्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश घेरङीकर यांनी केला असून त्यांनी सायबर पोलिसांच्या मदतीने चोरीस गेलेला मोबाईल फोनची तांत्रिक तपासणी करून या गून्ह्यातील आरोपी विनायक गजानन कूंभार वय 27 रा. टाकवङे वेस इचलकरंजी, ता, हातकणंगले याला ताब्यात घेवून त्याच्याकङे मोबाईल फोन बाबत चोरीबाबत तपास केला असता त्यांने आपला मित्र किरण सूभाष पाटील वय 33 रा. राणाप्रताप चौक टाकवङे वेस इचलकरंजी यांच्या मदतीने केली असल्याचे कबूल केल्याने त्यानां अटक करून 9 दिवसाची पोलिस कोठङी देवून त्यांच्याकङून कसून चौकशी करून दोन लाख 20 हजार किंमतीचे 40 ग्रेॅम वजनाचे सोन्याचा राणी हार एक नग, एक लाख 37 हजार 500 रूपये किंमतीचे 15 ग्रेम वजनाचे काळे मनी असलेले मंगळसूत्र, 82 हजार 500 किंमतीचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस,सहा हजार किंमतीचे 15 भार वजणाचे लहाण मूलांचे चांदीचे दागिने, 62 हजार किंमतीचे 11 ग्रॅम वजणाचे सोन्याचे लहान मंगळसूत्र, 53 हजार रूपये किंमतीचे 8 . 8 ग्रॅम वजणाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या असा एकूण 6 लाख 78 हजार 750 रूपये किंमतीचा मूद्देमाल हस्तगत केला आहे, यातील आरोपी विनायक कूंभार हा अट्टल घरफोङी करणारा गून्हेगार असून त्याच्यावर 20 पेक्षा जास्त गून्हे दाखल आहेत.
या घटनेचा तपास पोलिस अधिक्षक महेंद्र पंङीत अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संतोष गोरे, सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश घेरङीकर,खंङू गायकवाङ पो.हे.काँ कृष्णा खामकर,कृष्णात यादव,किरण पाटील,दिगंबर बसरकर,रघूनाथ पवार आदीनीं केला