महिलेवर तिघांकडून अत्याचार! फोटो व्हायरल करण्याची धमकी; राधानगरी तालुक्यातील घटना
संशयिताना पाच दिवसाची पोलिस कोठडी
राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथील एका विवाहित महिलेला एकाने तिच्या पतीला आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक संबंध ठेवून अश्लील फोटो काढले तर इतर दोघांनी त्या फोटो आणि त्याच्या संबंधाबाबत धमकावत शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून तिघांना राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे , या तिघांना राधानगरी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या बाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथील एकोणतीस वर्षीय विवाहित महिलेचे अश्लील फोटो काढून धमकावत फेब्रुवारी २०२३ ते जानेवारी २०२४ च्या दरम्यान फिर्यादीच्या घरी , आजीच्या घरी व एका महिलेच्या घरी शारीरिक संबंध प्रस्थापित करत अत्याचार केले.याबाबत गावातीलच मोहन रामचंद्र पोवार, सागर चंदर मोहिते ,रवींद्र श्रीपती बारड यांना राधानगरी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घेरडीकर,प्रणाली पवार यांच्यासह राधानगरी पोलीस करत आहेत