महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुरुंदवाड नांदणी दरम्यानच्या रस्त्यावर सांगली येथील युवकाचा निर्घृण खून ...!

04:42 PM Feb 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

कुरुंदवाड : प्रतिनिधी

Advertisement

कुरुंदवाड नांदणी दरम्यानच्या रस्त्यावर रेखा अनोळखी स्विफ्ट कार मध्ये एका युवकाचा निर्घृण खून झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली याबाबत अधिक माहिती कुरुंदवाड नांदणी मार्गावर गट क्रमांक 1012/1 यांच्या शेतलगत अनोळखी स्विफ्ट मोटार गाडीमध्ये ड्रायव्हर लगत असणाऱ्या सीटवर संतोष विष्णू कदम(वय.36,रा.गाव-भाग सांगली) या युवकाची धारदार चाकूने हत्या करून अज्ञात मारेकऱ्यांनी वाहन सोडून पलायन केले आहे.

Advertisement

दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करत असताना वाहनांमध्ये दोन धारदार चाकू आणि गाडीच्या पाठीमागे दोन स्पोर्ट बूट आणि संतोष कदम याचा झटापटीमध्ये फुटलेला मोबाईल वाहनात मिळून आला आहे. नांदणी कुरुंदवाड हा रस्ता हा रहदारीचा असल्याने तसेच शेतकरी आपल्या शेताकडे गुरुवर सकाळी जात असताना एका शेतकऱ्याने वाहनात डोकावून पाहिले असता एका युवकाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आला. त्याने लगेच पोलिसांनी संपर्क साधून सदरची माहिती दिली.

घटनास्थळी तात्काळ सपोनी रविराज फडणीस पोलीस फाट्यासह दाखल झाले काही क्षणातच पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे,सांगली शहरचे पोलीस निरीक्षक विजय मोरे, गुन्हे अन्वेषण विभाग, फॉरेन्सिक तपासणी केंद्राचे आणि स्वामी पथक घटनास्थळी दाखल होऊन तपासाची चक्री गतिमान केली आहेत. दरम्यान संतोष कदम हा सांगली येथे आरटीआय कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याची माहिती समोर येत असून नेमकी त्याची का हत्या केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तथापि फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाची दरवाजे खुली करून मृतदेह सविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून वाहनातून दोन धारदार चाकू स्पोर्ट बूट फुटलेला मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. कारमध्ये मोबाईल फुटलेल्या अवस्थेत मिळून आला असल्याने सदरची हत्याही होत असताना झटापट झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक समरजितसिंह साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाड पोलीस करीत आहेत

Advertisement
Tags :
@tarunbharat_officialCrimekolhapur
Next Article