कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Crime News: मित्राकडून मित्राचा गळा चिरुन खून, हनुमाननगर येथील धक्कादायक घटना

01:41 PM Sep 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

या दोघांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली

Advertisement

कोल्हापूर : हनुमाननगर परिसरातील वृद्ध रिक्षाचालक मोहन सूर्यकांत पोवार (वय 70) यांचा गळा चिरुन निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या सहा तासांमध्ये छडा लावत चंद्रकांत केदारी शेळके (वय 73, रा. मनोरमानगर, मोहिते मळा) याला अटक केली.

Advertisement

दोघे महाविद्यालयापासून मित्र होते. पोवार याने आईवरुन शिवीगाळ केल्यानेच त्यांचा खून केल्याची कबुली संशयित शेळके याने पोलिसांसमोर दिली. याबाबत अधिक माहिती अशी, मोहन पोवार व त्यांचा मुलगा पुष्कराज हे दोघे हनुमाननगर येथे राहतात.

मोहन पोवार यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचा मुलगा पुष्कराज हा एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरीस लागला आहे. गुरुवारी सकाळी तो आठ वाजण्याच्या सुमारास वडिलांना देवपूजा करा, मी दुपारपर्यंत येतो असे सांगून बाहेर पडला.

धुरामुळे खुनाच्या घटनेला वाचा

मोहन पोवार यांच्या घरातून धूर येत असल्याचे शेजारी राहणाऱ्या चंद्रनील कुलकर्णी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती सचिन हिलगे यांना दिली. हिलगे यांनी पोवार यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन न उचलल्यामुळे चंद्रनील व सचिन हे दोघे त्यांच्या घराकडे गेले. त्यांनी याची माहिती पोवार यांचा मुलगा पुष्कराजला दिली.

मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे किचनमधील दरवाजा तोडून या दोघांनी घरामध्ये प्रवेश केला. आत सर्वत्र धूर पसरला होता. या दोघांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली. दरम्यान पोवार यांचा मुलगा पुष्कराज व भाचा हर्षद खडके घटनास्थळी दाखल झाले.

घरातील धूर कमी झाल्यानंतर मोहन पोवार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. या नंतर या खुनाच्या घटनेला वाचा फुटली. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी भेट दिली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. फॉरेन्सिक पथकास घटनास्थळी पाचारण करुन नमुने घेण्यात आले.

समईने आग लावण्याचा प्रयत्न

हल्लेखोराने मोहन पोवार यांचा खून केल्यानंतर त्यांचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पोवार यांच्या देवघरातील एक समई मृतदेहाशेजारी आढळून आली. याच समईच्या साहाय्याने हल्लेखोराने घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच बेडवरील गादीला आग लावण्याचा प्रयत्न केला.

काल सत्कार आणि आज खून

हनुमाननगर तरुण मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याचे नियोजन केले होते. बुधवारी मोहन पोवार यांचा सत्कार करण्यात आला होता. कालच सत्कार आणी आज खून झाला. मोहन पोवार हे मनमिळावू होते. यामुळे पोवार यांच्या खुनानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत होती. वडिलांच्या खुनानंतर मुलगा पुष्कराज याने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

मृतदेह जळाला

हल्लेखोराने घरातील सर्व साहित्य विस्कटले होते. कपडे, गादी आणि कपाटातील साहित्य बाहेर काढून घराला आग लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे मृतदेहही काही प्रमाणात जळाला असल्याची माहिती समोर आली आहे.

सहा तासात खुनाचा उलगडा

पोवार यांच्या घरासमोर असणाऱ्या एका बंगल्यामधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यामध्ये ११ वाजण्याच्या सुमारास एक वयस्कर व्यक्ती घरामध्ये शिरताना दिसत आहे. हाच धागा पकडून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची लिंक जोडली असता, चंद्रकांत शेळके याच्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

त्याला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरातून ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर चंद्रकांत शेळके याने खुनाची कबुली दिली. शेळके म्हणाला, गुरुवारी सकाळी १० वाजता पोवार यांच्या घरात गेलो. यानंतर दोघेही चहा पित बसलो. चहा पित असतानाच पोवार आणि शेळके यांच्यात वाद झाला. याच वादातून चाकू आणि समईने पोवारच्या गळ्यावर आणी डोक्यात वार केल्याची कबुली दिली.

जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संयुक्त तपास करत सहा तासात खुनाचा छडा लावला. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस अंमलदार प्रवीण सावंत, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, प्रशांत पांडव, मोहन लगारे, वैभव पाटील, शुभम संकपाळ, समीर कांबळे यांनी हा तपास केला.

Advertisement
Tags :
@kolhapur@KOLHAPUR_NEWS#crime news#pachgaon#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediakolhapur crime news
Next Article