For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime इथे दारु प्यायला बसू नका असे सांगितल्याचा राग मनात धरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण, कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीतला प्रकार

04:18 PM Jun 02, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
kolhapur crime इथे दारु प्यायला बसू नका असे सांगितल्याचा राग मनात धरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण  कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीतला प्रकार
Advertisement

आमच्या दारात टेम्पो लावू नका. इथे दारू प्यायला बसू नका असे सांगितल्याचा राग मनात धरून दोघांनी केलेल्या मारहाणीत लक्षतीर्थ वसाहत येथील दोघेजण जखमी झाले. याबाबत लक्ष्मीपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत लक्ष्मीपूरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, सुतार मळा, लक्षतीर्थ वसाहत येथे राहणारे रामचंद्र यादव यांनी यातील आरोपी रामा कात्रट व अंकुश कात्रट यांना आमच्या दारात टेम्पो लावू नका, तसेच इथे दारू प्यायला बसू नका असे सांगितले होते. त्याचा राग मनात धरून रामा कात्रट व अंकुश कात्रट यांनी फिर्यादी भक्ती राहुल यादव, तिचे पती राहुल रामचंद्र यादव, सासरे रामचंद्र यादव व सासू रेखा यादव यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार भक्ती राहुल यादव यांचे सासरे रामचंद्र यादव यांना डोळ्याजवळ सळीने मारहाण केल्यामुळे ते  गंभीर जखमी झाले. याप्रकरणी भक्ती राहुल यादव (रा. सुतार मळा, लक्षतीर्थ वसाहत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामा कात्रट व अंकुश कात्रट (दोघे रा. सुतार मळा, लक्षतीर्थ वसाहत) या दोन संशयितांवर लक्ष्मीपूरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.