कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गरीबांच्या 'थोरल्या' दवाखान्याला लुटण्याचे पाप, दोषींवर कारवाईची मागणी

03:19 PM Apr 19, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

सीपीआरच्या काही ओपीडीमधील ठराविक डॉक्टर रूग्ण तपासणीसाठी वेळेत हजर राहत नसल्याच्या कायम तक्रारी केल्या जातात.

Advertisement

By : इम्रान गवंडी 

Advertisement

कोल्हापूर : गरीब व गरजूंना अधारवड असणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयातील (सीपीआर) गैरकारभार चव्हाट्यावर आले. कधी औषध घोटाळा, कधी सर्जिकल साहित्य फसवणूक, कधी खासगी लॅब प्रपिनिधींचा शिरकाव, कधी बनावट सही शिक्क्याने कर्मचारी भरती, डॉक्टरांवरील हल्ले, रूग्णांच्या तक्रारी आदी घडणाऱ्या घटनांमुळे गरीबांच्या या थोरल्या दवाखान्याच्या प्रतिमेला तडा जात आहे.

येथील अपप्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते. पण गेल्या अनेक वर्षात झालेल्या गैर प्रकारात किती जण दोषी ठरले?, त्यांच्यावर काय कारवाई झाली? याचे उत्तर शोधूनही सापडत नाही. याचा अर्थ कुंपणच शेत खातेय असा समाजायचा काय? अशी चर्चा आहे. बनावटगिरीला बळ देणाऱ्या प्रवृत्तीला कठोर शासन होऊन गरीबांचा दवाखाना असणारा सीपीआरचा कारभार व्यवस्थित चालावा, अशीच अपेक्षा रूग्ण व नातेवाईकांसह समस्त नागरीकांतून होत आहे.

सीपीआरमध्ये सध्या गाजत असलेल्या बोगस सर्जिकल साहित्याचा पुरवठा करून फसवणूक केल्या प्रकरणी गुरूवारी पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. खोटे दर करारपत्र दाखवून 4 कोटी 87 लाख 30 हजार 500 रूपयांचे बोगस सर्जिकल साहित्याचा पुरवठा करून फसवणूक केल्या प्रकरणी संशयित मयुर लिंबेकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

असा झाला सर्जिकल साहित्य घोटाळा

पोलीस तपासातील माहितीनुसार, सन-2022 ते 10 मार्च 2023 रोजीच्या कालावधीत सीपीआरमध्ये लिंबेकर याने फसवणूक करण्याच्या उद्देशाने व खरेदी टेंडर मिळवण्यासाठी मुंबईतील मुलुंड येथील ईएसआयएस हॉस्पिटलच्या वैद्यकिय अधीक्षकांचा संदर्भ क्रमांक असलेले व त्यावर बनावट नाव व सहीचा उल्लेख असलेले बनावट दर करारपत्र सादर केले. बनावट कंपनीच्या शिक्का व सहीचे कागदपत्रे तयार करुन सीपीआरला चार कोटी 87 लाख, 30 हजारपाचशे रुपये किंमतीचे स्ट्रराईल ड्रेसिंग पॅड अशा सर्जिकल साहित्याचा पुरवठा करुन फसवणूक केल्याचे म्हंटले आहे.

बोगस करारपत्रकाद्वारे पाच कोटींचा डल्ला

शासनाच्या निधीच्या बचतीसाठी जीईएम पोर्टलवर कमी किमतीत साहित्य खरेदी करावे, याची खरेदी मुलंडच्या इएसआयसी दर करारानुसार करावे, असे बैठकीत निश्चित केले होते. पण संबंधित कंपनीने इएसआयसी मुलुंडचे बोगस दराचे करारपत्र तयार करून पाच कोटी डल्ला मारल्याचा ठपका संबंधितांवर आहे.

त्या प्रकरणांचे काय झाले?

मागील दोन महिन्यापूर्वी खासगी लॅब प्रतिनिधीकडून रुग्णांची होणारी लुट, तपासणीसाठी सीपीआरमधील डॉक्टर व लॅब प्रतिनिधींचे असणारे लागेबांधे एका संघटनेने उघडकीस आणले होते. अद्याप यातील कोणावरही कारवाई झालेली नाही. याच दरम्यान तर चक्क अधिष्ठाता व जिल्हाधिकारी यांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करून सीपीआरमध्ये नोकरीचे बनावट प्रमाण देण्यापर्यंत फसवणुकीचे प्रकार समोर झाले आहेत. याचे पुढे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

डॉक्टरांवरही हवा वचक

सीपीआरमधल बहुतांश डॉक्टर प्रामाणिपणे रूग्णसेवा बजावतात. मात्र, सीपीआरच्या काही ओपीडीमधील ठराविक डॉक्टर रूग्ण तपासणीसाठी वेळेत हजर राहत नसल्याच्या कायम तक्रारी केल्या जातात. काहीवेळा हजेरी लावून डॉक्टर आपल्या खासगी ओपीडीकडे जातात. त्यामुळे सीपीआरमध्ये कमी तर स्वत:च्या खासगी दवाखान्यात जादा वेळ देत असल्याचेही उदाहरणे आहेत. अशा तक्रारी असणाऱ्या डॉक्टर, कर्मचारी व अधिकाऱ्यांवरही वचक कोण ठेवणार?

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS# medical institutes#cpr_hospital#CPR_Kolhapurnews#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article