For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शक्तीपीठ विरोधात विरोधक आक्रमक! शक्तीपीठ रद्दच झाला पाहिजे अशी मागणी करत विधिमंडळात सतेज पाटलांनी सरकारला धरले धारेवर 

10:29 PM Jun 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
शक्तीपीठ विरोधात विरोधक आक्रमक  शक्तीपीठ रद्दच झाला पाहिजे अशी मागणी करत विधिमंडळात सतेज पाटलांनी सरकारला धरले धारेवर 
Advertisement

लक्षवेधीच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची केली विधान परिषदेत मागणी

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली. शक्तीपीठ जोडण्यासाठी हा महामार्ग आहे की इलेक्ट्रॉल बॉण्ड घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर साठी आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला..

Advertisement

27 हजार एकर सुपीक जमिनीतून हा महामार्ग जाणार असल्याने, शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठे नुकसान होणार आहे. शक्तीपीठ महामार्ग व्हावा अशी कोणाचीही, मागणी नसून कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचा हा महामार्ग आहे. यातील हूजुर कोण आहे. असा घणाघात त्यांनी केला.विरोधी सदस्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले

शक्तीपीठ महामार्ग विरोधात आमदार सतेज पाटील यांनी आक्रमकपणे, विधान परिषदेत लक्षवेधी मांडली. या महामार्गाला केवळ स्थगिती नको तर हा महामार्ग रद्द करा अशी मागणीही त्यांनी विधान परिषदेत केली. शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा हा महामार्ग आहे.

07 फेब्रुवारी 2024 ला या महामार्गाची आखणी करण्यात आला. आणि 28 फेब्रुवारी 2024 ला हा राज्य महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला. 20 दिवसांमध्ये याची आखणी करून 12 हजार 589 गटातून हा महामार्ग जाणार असल्याचे सांगण्यात आले. वीस दिवसात अशा प्रकारे आखणी करुन 7 मार्च 2024 ला भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात येत असेल तर अधिकाऱ्यांना पुरस्कार द्यावा लागेल. असेही त्यांनी सांगितले. या राज्यामध्ये प्रकल्प पुर्ण 50 वर्ष झाले, तरीही त्या संदर्भातल्या पुनर्वसनाचे निर्णय प्रलंबित आहेत. मग एवढे घाई करून या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला देण्यात येणार आहे. यासाठी हा रस्ता केला जातो काय ?असा सवालही आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

नागपूर रत्नागिरी महामार्ग अस्तित्वात असताना आता नव्याने हा महामार्ग करण्याची गरज आहे काय? वर्धा जिल्हातून हा महामार्ग सुरु होत आहे. महात्मा गांधींच्या विचारांचा हा ऐतिहासिक जिल्हा गोव्याला कोणत्या हेतूने जोडला जाणार

आहे. कुठली विचारसरणी यामागे आहे काय?शक्तीपीठ महामार्ग व्हावा यासाठी कोणाचीही मागणी नाही. कोल्हापूर रत्नागिरी हा महामार्ग गोव्याकडे गेला आहे . संकेश्वर मार्गे जाणारा मार्ग कोकणातून गोव्याला जोडणारा आहे. याशिवाय गगनबावड्यातूनही तळ कोकणाकडे जाणारा महामार्ग गोव्याला गेला आहे.. त्याच्या भू संपादनाला लोकांनी विरोध केलेला नाही.गोव्याकडे जाण्यासाठी समांतर आणि पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. पर्यायी मार्ग असताना केवळ, कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी हा रस्ता केला जात आहे. यातील, हुजूर कोण आहे ?ते संबंधीत मंत्र्यांनी जाहीर कराव.असे आव्हानही आमदार सतेज पाटील यांनी केलं.

या प्रश्नावर मंत्री दादा भुसे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.पण विरोधी आमदारांनी सरकार आणि शक्तीपीठ महामार्गा विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली .मंत्री भुसे आपली बाजू तावातावाने मांडत होते, आणि विरोधी सदस्य घोषणा देत होते. त्यामुळे आ.नीलम गोऱ्हे यांनी कामकाज तहकूब केले..

Advertisement
Tags :

.