Kolhapur Breaking : मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर...मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या..!
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्या वेळापूर्वीच कोल्हापुरात दाखल झाले. कणेरी मठ येथील गोशाळेच्या आयव्हीएफ केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असली तरीही मराठा आंदोलकांकडून राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले आहे.
कोल्हापूर दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उशिरा आले. राज्य भरात चाललेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांना घेराव घालण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा ही मराठा आंदोलकांकडून अडवण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या या दौ-याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती.
दरम्यान, आज मुख्यमंत्री कोल्हापूरात आल्याची माहिती लागताच कोल्हापूरातील सकल मराठा समाज आणि आंदोलक कणेरी माकडे जाण्यासाठी प्रयत्नात असताना पोलीसांनी त्यांनी थांबवले.
आक्रमक झालेल्या सकल मराठा समाजाच्या कोल्हापुरच्या मराठा आंदोलकांनी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मारला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून मुख्यमंत्र्यांचा आणि राज्य शासनाचा जोरदार निषेध केला.