मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पर्यायी जागेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे अभिनव फाउंडेशनला आदेश
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी येथील बहुचर्चित मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या पर्यायी जागेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अर्जदार अभिनव फाउंडेशनला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाबाबत कोल्हापूर सर्किट बेंचसमोर अभिनव फाउंडेशनचे वकील ॲड महेश राहुल यांनी सावंतवाडी शहरात अडीच हेक्टर जागा शहरात आरक्षित असल्याचे सांगितले. तसेच आरक्षित असलेल्या जागेचा नकाशा न्यायालयात दाखवला. या संदर्भात न्यायालयाने पर्यायी जागेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश अर्जदार अभिनव फाउंडेशनला दिले आहेत. दरम्यान सरकार पक्षातर्फे मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या जागे संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात खटला प्रलंबित आहे त्याचा लवकरात लवकर निकाल लागेल असे सांगितले.