For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति किलो १० रुपयांचे अनुदान

10:21 AM Jul 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति किलो १० रुपयांचे अनुदान
Dr. Chetan Narake
Advertisement

काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति किलो १० रुपयांचे अनुदान

Advertisement

चेतन नरके यांची माहीती : अनुदानासाठी केले होते सरकार दरबारी प्रयत्न

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड, आजरा तालुक्यात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, पण त्याला यंदा भाव मिळाला नसल्याने राज्य सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे व राज्याचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्याकडे केली होती. गेली तीन महिने सरकारच्या पातळीवर सातत्याने पाठपुरावा केल्याने काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो दहा रुपयांचे अनुदान मिळाल्याची माहीती ‘गोकुळ’‘चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी पत्रकातून दिली.

Advertisement

काजू उत्पादकांना अनेक संकटाने सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी काजू बोर्डची मागणी गेली अनेक वर्षे सुरु होती. काजू बोर्ड चंदगडलाच व्हावे, अशी आग्रही मागणी मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर राज्य सरकारने बाेर्डची स्थापना केली होती. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ता चंदगड, आजरा भागात गेल्यानंतर तेथील शेतकऱ्यांनी काजूला मिळणारा दर आणि उत्पादन खर्च याचे हिशोब मांडून काजूला अनुदान देण्याची मागणी सरकार दरबारी करावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार तीन महिन्यापुर्वी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन वस्तूस्थिती सांगितली. त्यानंतर प्रधान सचिव अनुप कुमार यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. काजू अनुदानासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही प्रयत्न केले. त्यातूनच राज्य सरकारने काजूला प्रतिकिलो १० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. काजू बीसाठी प्रति किलो दहा रुपये प्रमाणे किमान ५० किलो तर कमाल २०० किलोपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यासाठी २७९ कोटी खर्चास मान्यता दिली आहे.

Advertisement
Tags :

.