For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur theft | सावध नजर आणि अचूक टायमिंग! अवघ्या ६० मिनिटांत घर साफ करणाऱ्या 'त्या' चोरट्याचा गेम ओव्हर

11:49 AM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur theft   सावध नजर आणि अचूक टायमिंग  अवघ्या ६० मिनिटांत घर साफ करणाऱ्या  त्या  चोरट्याचा गेम ओव्हर
Advertisement

               कोल्हापुरात घरफोडी करणारा चोरटा एका तासात जेरबंद

Advertisement

कोल्हापूर : बंद घरावर पाळतठेवून एका तासात २ तोळे दागिने आणि रोख ३० हजार रुपये लंपास करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. अक्षय महादेव बोकमूरकर (वय ३७रा. काटे मळा, मुक्त सैनिक वसाहत) असे त्याचे नांव आहे. त्याच्याकडून २३ ग्रॅम वजनाचे गंठण पोलिसांनी हस्तगत केले. बुधवारी (८ एप्रिल) रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास मुक्त सैनिक वसाहत परिसरात ही घटना घडली होती. याबाबतची फिर्याद संतोष यमकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.

संतोष यमकर हे पत्नी, मुलगी,मुलासह मुक्त सैनिक वसाहत येथेसावंत यांच्या घरी भाड्याने राहतात.बुधवारी सकाळी संतोष कामासाठीबाहेर गेले होते, तर त्यांच्या पत्नीहीकामानिमित घराबाहेर गेल्या होत्या.१२ वाजता त्या परत आल्या असता,त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडादिसला. त्यांनी आतमध्ये जाऊनपाहिले असता अॅल्युमिनियमच्या डब्यात ठेवलेले २ तोळ्याचे मंगळसूत्र आणि रोख ३० हजार रुपये असा सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल नसल्याचे दिसून आले.

Advertisement

या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक करत होते. पथकातील लखनसिंग पाटील, महेश पाटील, सागर माने, संदीप बेंद्रे यांना यांनी सापळा रचून मुक्त सैनिक वसाहत येथील रिक्षा स्टॉपजवळ अक्षय बोकमूरकर याला अटक केली.

पैश्यांची चणचण भासल्याने चोरी
अक्षय महादेव बोकमूरकर हा मुक्त सैनिक परिसरातील एका ट्रक गॅरेजमध्ये कामाला आहे. ट्रकच्या बॉडीचे काम या ठिकाणी केले जाते. ट्रकचे काम करत असताना पैश्याची चणचण भासल्यानेच अक्षयने चोरी केल्याची माहिती समोर आली आहे

Advertisement
Tags :

.