कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Breaking : तीनपानी जुगार अड्ड्यावर गांधीनगर पोलिसांची धाड; 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, सतरा जण ताब्यात

09:25 PM Nov 03, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

गांधीनगर परिसरात खळबळ

Advertisement

उचगाव/प्रतिनिधी

Advertisement

गांधीनगर ता.करवीर मुख्य रस्त्यावर उचगाव हद्दीतील मळ्यात सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री एक वाजता गांधीनगर पोलिसांनी धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह त्यामध्ये १३ मोबाईल, ६ मोटर सायकल व रोख रक्कम ५२०००/- रुपये असा सहा लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

यावेळी खेळणाऱ्या सतरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा व कलम ४ व ५ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रकरणी गांधीनगर परिसरात पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे यांनी फिर्याद दिली.

गांधीनगर मुख्य रस्त्यावर उचगाव हद्दीतील मळ्यातील एका बंद वाड्यात तीन पानी जुगार अड्डा असल्याची माहिती गांधीनगरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांना मिळाली. गुरुवारी मध्यरात्री रात्री एक वाजता सपोनी अर्जुन घोडे पाटील यांनी तीन पानी जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी तीन पानी जुगार खेळणाऱ्या सतरा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील एकुण ६,०५२००/- रुपयांचा मुददेमाल, त्यात रोख रक्कम ५२०००/- रुपये तसेच जुगाराचे साहित्यासह मुददेमाल विना परवाना बेकायदा तीन पाणी पत्याच्या जुगारावर पैसे लावुन जुगार खेळत असताना मिळुन आल्याने कारवाई करण्यात आली.संशयित आरोपींचे नाव व पता खालील प्रमाणे,

१) कमलेश इंद्रलाल दर्याणी, वय ३० वर्ष, रा. वोल्ड पोस्ट ऑफिस गांधीनगर, २) सुरेश पोपट माने, वय ३० वर्ष, रा. इंदीरानगर वसाहत गांधीनगर, ३) अविनाश गंगाधर सुतार, वय २५ वर्ष, रा. कनाननगर, मस्के किरण स्टेअर्स, शाहुपूरी कोल्हापूर, ४) बलराज उज्वल गवळी, वय ३२ वर्ष, रा. इंद्रजीत कॉलनी, जाधववाडी, कोल्हापूर, ५) अभिजीत राजाराम तोडकर, वय ४३ वर्ष, रा. दुधाळी कोल्हापूर, ६) शुभम संदीप आळवेकर, वय ४७ वर्ष, रा. कनाननगर, मस्के किरण | स्टेअर्स, शाहुपूरी कोल्हापूर, ७) मुकेश बलराम राजपुत, वय ३५ वर्ष, रा. 182/8 गांधीनगर, ता. करवीर, ८) गदर लमवेल सकटे, वय २२ वर्ष, रा. कनाननगर, मस्के किरण स्टेअर्स, शाहुपूरी | कोल्हापूर, ९) अजय तानाजी जाधव, वय २५ वर्ष, रा. गोसावी गल्ली, उचगाव, ता. करवीर, १०) ओंकार राजेंद्र जाधव, वय २९ वर्ष, रा. जाधववाडी तालीमजवळ, कोल्हापूर,११) मुरली ब्रिजलाल लुलानी, वय ४८ वर्ष, रा. ३१/९ गांधीनगर, ता. करवीर, १२] विर बबन जाधव, वय ३४ वर्ष, रा. पोवार मळा, उचगाव, १३] गणेश सुरेश गोसावी, वय २३ वर्ष, रा. पोवार मळा, उचगाव, १४) मुकेश सुरेशलाल राजाणी, वय ३४ वर्ष, रा. गुरुनानक चौक, गांधीनगर, १५) तानाजी रामु जाधव, वय ३३ वर्ष, रा. पोवार मळा, उचगाव, १६) रवि मदनलाल चंदवाणी, वय ४० वर्ष, रा. गुरुनानक चौक, गांधीनगर, १७) रोषन दत्तात्रय माने, वय ३८ वर्ष, रा. विक्रमनगर, हनुमान मंदीर कोल्हापूर अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत गांधीनगर पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सपोनि अर्जुन घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सावंत करीत आहेत.

 

Advertisement
Tags :
Kolhapur Breaking Gandhinagar police raid Tinpani gambling
Next Article